Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 17th July 2023 Monday Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

1. Opposition Parties Meeting: 24 पक्ष, 6 अजेंडे… विरोधी पक्षांची दुसरी महाबैठक; डिनरसाठी शरद पवार- ममता बॅनर्जी मात्र अनुपस्थित

Opposition Parties Meeting News Updates : 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी एकजूट करण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांसाठी 17-18 जुलै ही तारीख खूप महत्त्वाची आहे. या दोन्ही दिवशी पुन्हा एकदा विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यापूर्वी विरोधकांची पाटण्यात एक सभा झाली होती, त्यानंतर आज आणि उद्या विरोधक बंगळुरूमध्ये (Bengaluru) एकत्र येणार आहेत. या बैठकीचा अजेंडा आणि मिनिट टू मिनिटाचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला असून, त्यामुळे या बैठकीत तरी विरोधी एकजुटीच्या दिशेनं विरोधक ठोस निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वाचा सविस्तर 

2. Maharashtra Assembly Session: दुखावलेले विरोधक आक्रमक होणार की सत्ताधारी वरचढ ठरणार? आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

Maharashtra Assembly Session:  शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) पार पडत आहे. त्यामुळे दुखावलेले विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होणार की अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) गट सत्तेत आल्याने सत्ताधारी वरचढ ठरणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी, महागाई यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. वाचा सविस्तर 

3. Weather Update Today : मुसळधार! आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Heavy Rain in India : देशभरात मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. डोंगराळ भागांसह मैदानी प्रदेशात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. दरम्यान, हा आठवडा पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हा आठवडा मुसळधार पाऊस कोसळणार असून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.  हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर ओडिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंड दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. यामुळे पुढील पाच दिवस मध्य आणि पूर्व भारतात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर 

4. PM Modi Visits : पंतप्रधान मोदींचा फ्रान्स, UAE दौरा ही ‘भारताच्या यशाची कहाणी’ : केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी

PM Narendra Modi France And UAE Visits : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नुकतेच फ्रान्स आणि UAE दौऱ्याहून भारतात आले. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या अलीकडील दौर्‍यांना ‘यशस्वी’ म्हणून संबोधले आहे. तसेच, या भेटींचे काही ठोस परिणाम देखील येणाऱ्या काळात दिसून येतील असेही ते म्हणाले. वाचा सविस्तर 

5. Wimbledon Final 2023: पराभव पचेना… हरल्यानंतर जोकोविच संतापला, रॅकेटचा आपटून आपटून केला चक्काचूर, पाहा VIDEO

Wimbledon Final 2023: विम्बल्डनचा (Wimbledon Final 2023) अंतिम सामना नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) आणि कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) यांच्यात खेळवण्यात आला. जोकोविचचा हा सामना जिंकणार हे जवळपास सर्वच चाहत्यांनी मनात ठरवलंच होतं. पण त्याच्यात आणि अल्कारेझमध्ये खेळवण्यात आलेल्या एका रोमांचक सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. वाचा सविस्तर 

6. Who Is Carlos Alcaraz: वय 20 वर्ष, जिंकलं पहिलं विम्बल्डन; जोकोविचच्या हातून पाचवं विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?

Who Is Carlos Alcaraz: कार्लोस अल्कारेझनं (Carlos Alcaraz) विम्बल्डन 2023 चं (Wimbledon 2023) विजेतेपद पटकावलं. अल्कारेझनं अंतिम फेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा (Novak Djokovic) पराभव केला. पाचव्या सेटमध्ये जोकोविचचा पराभव करून त्यानं आपलं पहिलं विम्बल्डन विजेतेपद पटकावलं. वाचा सविस्तर 

7. Aashadh Deep Amavasya 2023 : आज ‘दीप अमावस्या’, जाणून घ्या दिनाचं महत्त्व आणि ‘या’ मंत्राचा करा जप

Aashadh Deep Amavasya 2023 : आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या (Deep Amavasya 2023)  ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते. या अमावास्येला दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. वाचा सविस्तर 

8. Today In History : मुंबईजवळ ‘रामदास’ बोट बुडाली, 625 जणांचा मृत्यू; इतिहासात आज

What Happened on July 17th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 17 जुलै रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. वाचा सविस्तर 

9. Horoscope Today 17 July 2023 : मेष, कन्या, धनु राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 17 July 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. सिंह राशीचे लोक त्यांच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ आपल्या जोडीदारासाठी काढतील, तर कुंभ राशीच्या लोकांना नवीन वाहनाचा आनंद मिळेल. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल सोमवार दिवस? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

[ad_2]

Related posts