रस्त्यावर पडलेले पैसे उचलावेत की नाही? जाणून घ्या शुभ- अशुभ संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Finding Money On Road: रस्त्यावरुन जाताना कधी तरी आपल्याला पैसे पडलेले सापडतात. पण हे पैसे उचलावे की नाही याचा आपण विचार करतो. रस्त्यावर पडलेल्या पैशांविषयी ज्योतिषशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. रस्तावर पैसे सापडण्याचेही शुभ आणि अशुभ संकेत आहेत. या संकेताचा नेमका अर्थ काय होतो हे आपण आज सविस्तर जाणून घेऊया. 

रस्त्यावर पैसे सापडणे हा एक शुभ संकेत असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. रस्त्यावर पडलेले पैसे उचलावेत असं ज्योतिषशास्त्रात मानले आहे. हा एक देवाचा आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. त्यामुळं जीवनातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. मात्र नोटा आणि नाणी सापडल्याचा वेगवेगळा अर्थ होतो. काय आहेत या मान्यता जाणून घेऊया. 

– रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे म्हणजे धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे व लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होईल, असं संकेत असल्याची मान्यता आहे. 

– नोट सापडणे म्हणजे तुमच्या अडचणी दूर होतात, अशी मान्यता आहे. लवकरच तुमच्या जीवनात मोठा आनंदाचा क्षण येणार असल्याचेही हे संकेत आहे. 

– तुम्ही एखादे नवीन काम सुरु करण्याच्या विचारात आहात आणि त्याचवेळी तुम्हाला रस्त्यावर नाणे पडलेले दिसले. तर त्याचा अर्थ तुमचं काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. 

– रस्त्यात पैशाने भरलेले पर्स मिळाली तर ते भाग्योदयाचे लक्षण आहे, असं मानले जाते. 

– तुम्ही स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करत असाल तर त्याचवेळी तुम्हाला रस्त्यात नाणे सापडले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 

– ज्या लोकांना अचानक एखादी नोट रस्त्यावर सापडली असेल तुमच्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्या येत नाहीत, असंही सांगितलं जातं. 

एखाद्या व्यक्तीला त्याच्या ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणाहून परतताना रस्त्यात पैसे पडलेले दिसले, तर ते तुम्हाला आगामी काळात आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत.

पैसे सापडल्यावर काय करावे? 

– जर तुम्हाला एक रुपयाचे नाणे सापडले तर ते उचलून कपाळाला लावा. त्यानंतर तसेच तुमच्या पाकिटात किंवा खिशात ठेवा

– घरी गेल्यांनतर ते पैसे आणि धणे एका छोट्या पिशवीत टाका आणि ती पिशवी तिजोरीत ठेवा. जेव्हा तूम्ही एखादे मोठे आर्थिक उलाढाल करण्यासाठी जात असाल तेव्हा ती पिशवी सोबत घेऊन जा. यामूळे तूमचे काम नक्की होईल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts