15 Arrested In Jaipur For Robbing House; ६०० कोटींच्या खजिन्यासाठी घरफोडी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जयपूर: राजस्थानच्या जयपूरमध्ये एका घरात १५ जण एकाचवेळी चोरी करण्याच्या उद्देशानं शिरले. जयपूरच्या धाबास परिसरात ही घटना घडली. घटनेमागे एका मांत्रिक महिलेचा हात होता. घरामध्ये ६०० कोटी रुपये लपवण्यात आल्याचं अजमेरच्या नसिराबादमधील शीबा बानोनं तिच्या मानलेल्या भावांना सांगितलं.जयपूरच्या धाबासमध्ये वास्तव्यास असलेल्या यादव राम मौर्य यांच्या घरात ६०० कोटी रुपये लपवण्यात आल्याचं शीबा बानोनं तिचे भाऊ रामेश्वर राठी आणि दिनदयाळ राठी यांना सांगितलं. मौर्य यांच्या बेडरुममध्ये रोकड लपवण्यात आल्याची माहिती बानोनं दिली. यानंतर दोन्ही भावांनी योजना आखण्यास सुरुवात केली. रक्कम मोठी असल्यानं त्यांनी उत्तर प्रदेशातून काही जणांना बोलावलं. कथित खजिना लुटण्यासाठी रामेश्वर आणि दिनदयाळ यांनी तंत्रमंत्रांचा आधार घेतला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं.
व्हॉट्स अ‍ॅप डीपी बदलला, पोलिसांनी बेड्या ठोकल्या; हुश्शार महिला तुरुंगात, प्रकरण काय?
यानंतर रामेश्वर आणि दिनदयाळ थेट जयपूरमधील घरात घुसले. त्यांनी खनिजा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी टाईल्स फोडल्या. मात्र हाती काहीच लागलं नाही. या प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. शीबा बानोच्या परिचयातील सुनील सेन अजमेरच्या रामगंजमध्ये राहायला आहे. तंत्रमंत्राच्या मदतीनं धन काढण्याचा दावा सुनील करतो. त्याच्याबद्दल शीबानं तिच्या मानलेल्या भावांना सांगितलं. यादव राम मौर्य यांच्या घरातून ६०० कोटी रुपये मिळवण्यासाठी रामेश्वर आणि दिनदयाळ यांनी सुनीलकडे उपाय मागितला. त्यानंतर सुनीलनं तंत्रमंत्रास सुरुवात केली. त्यानं दोघांकडून बरंच सामान मागितलं.
सचिवालयाजवळ सापडल्या २ हजारांच्या ७,२९८ नोटा, १ किलोचं सोन्याचं बिस्किट; घबाड कोणाचं?
जयपूरच्या धाबासमध्ये येऊन सुनीलनं यादव यांच्या घराची रेकी केली. तंत्रमंत्राचा वापर करुन पैसे मिळवण्यात अपयश आलं. त्यानंतर रामेश्वर आणि दिनदयाळ यांनी घरावर दरोडा टाकून ६०० कोटी लुटण्याची योजना आखली. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातून दोन गुन्हेगारांना बोलावलं. आणखी काही जणांना सोबत घेतलं. १२ मेच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास १० जण यादवराम मौर्य यांच्या घरी पोहोचले. त्यांनी बेसमेंटमधील ग्रंथालयाचं कुलूप फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील कडी तोडून वर पोहोचले.
तूच किरण, तूच अंधार! मैत्रिणीला संपवून तरुणाचं टोकाचं पाऊल; लॅपटॉपमध्ये २३ मिनिटांचा VIDEO
शीबा बानोच्या सांगण्यावर रामेश्वर आणि दिनदयाळ यांना विश्वास होता. त्यांनी घरात घुसताच यादव राम मौर्यचा मुलगा आणि मुलीला बांधून ठेवलं. त्यांच्या कानशिलावर पिस्तुल ठेवून पैशांबद्दल विचारणा केली. घरात होत असलेला आवाज ऐकून यादव राम आणि त्याच्या पत्नीला जाग आली. दोघे मुलामुलीला वाचवण्यास धावले. मात्र आरोपींनी त्यांनादेखील बांधलं. घरात रोकड नसल्यानं मौर्य यांचं कुटुंब वारंवार सांगत होतं.

बेडरुममध्ये रोकड लपवण्यात आल्याचं शीबानं सांगितलं होतं. त्यामुळे रामेश्वर आणि दिनदयाळ यांनी बेड तोडून शोधाशोध केली. तिथे त्यांना काही चांदीचे दागिने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं सापडली. यानंतर आरोपींनी स्वयंपाकघर आणि बाकीच्या खोल्यांमधील टाईल्स तोडल्या. संपूर्ण घर खणलं. मात्र त्यांच्या हाती मातीशिवाय काहीच लागलं नाही. त्यामुळे आरोपींनी चांदीचे दागिने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं घेऊन पळ काढला. जाता जाता त्यांनी मौर्य परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित कुटुंबाच्या तक्रारीनंतर १५ जणांना अटक करण्यात आली.

[ad_2]

Related posts