BJP Led NDA Alliance Meeting In Delhi Tomorrow Also Opposition Party Meeting In Bengaluru Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BJP Alliance Meeting: बेंगळुरूमध्ये विरोधकांच्या बैठकीचं (Opposition Meeting) आयोजन केलं असतानच भाजपकडून मित्र पक्षांच्या बैठकीचं (NDA Meeting) मंगळवार (17 जुलै) रोजी आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. भाजपच्या विरोधात एकजूट दाखवण्यासाठी विरोधी पक्षांच्या महाबैठकीचं सत्र सुरु आहे. त्याचप्रमाणे भाजपही आपली ताकद वाढवण्याची तयारी करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंगळवारचा दिवस देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएची बैठक पार पडणार असल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दिली आहे. या बैठकीमध्ये 38 पक्ष सामील होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. मागील नऊ वर्षांमध्ये एनडीए पक्षाच्या विकासाचा अजेंडा, सुविधा, रणनीती यांमध्ये एनडीएमध्ये सामील असलेल्या सर्व पक्षांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये एनडीएमध्ये सामील सर्व पक्ष हजर राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

जे.पी नड्डा यांनी साधला विरोधकांवर निशाणा 

विरोधी पक्षांच्या बैठकीवर भाष्य करताना जे.पी.नड्डा यांनी म्हटलं की, आमची एकजूट ही सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी आहे. त्यांच्या ना नेता आहे, ना नीति आहे आणि त्यांच्याकडे निर्णय घेण्याची देखील ताकद नाही असं म्हणत नड्डा यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे. 

‘हे’ पक्ष होणार बैठकीत सहभागी

दिल्लीमध्ये होणाऱ्या या बैठकीसाठी भाजपचे अनेक मित्रपक्ष सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामधील शिवसेना पक्ष, अजित पवारांच्या नेतृत्वामधील राष्ट्रवादीचा गट, सुहेलदेव भारतीय समाजवादी पक्ष, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर), राष्ट्रीय जनता दल (RJLD) आणि इतर अनेक मोठे पक्ष सहभागी होणार आहेत.

एकीकडे विरोधकांची बैठक तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांच्या बैठक ही निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्व असल्याचं म्हटलं जात आहेत. त्यामुळे आगमी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच रंगणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या बैठकांकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

हे ही वाचा : 

ABP C Voter Survey: छोट्या पक्षांना बैठकीत आमंत्रित करणं विरोधकांचा मास्टरस्ट्रोक? पाहा काय सांगतो सर्वे



[ad_2]

Related posts