Mars will enter Virgo These zodiac signs will have prosperous days success in every work

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mars Transit 2023 : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांची हालचाल आणि त्यांच्या राशीतील बदलांचा प्रभाव सर्व राशीवर पडतो. ज्योतिष शास्त्रात मंगळ हा धैर्य, शौर्य, शौर्य, भूमी आणि क्रोध यांचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी मंगळ ग्रह गोचर करतो त्यावेळी सर्व राशींवर विशेष प्रभाव पडतो. 

जुलैमध्ये मंगळाने गोचर केलं असून 18 ऑगस्टपर्यंत तो या राशीत राहणार आहे. तर मंगळ ग्रह ऑगस्टमध्ये कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण यावेळी काही राशी अशा आहे, ज्यांच्यावर सकारात्मक आणि चांगला परिणाम दिसून येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत

सिंह रास (Leo Zodiac)

मंगळ ग्रहाचं गोचर तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतं. मंगळ तुमच्या राशीतून धनाच्या घरात भ्रमण करणार आहे. त्यामुळे यावेळी नशीब तुमच्यावर अनुकूल असेल. यावेळी विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट होतील. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही ठीक होणार आहे. तुम्हाला मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर या काळात तुम्हाला धार्मिक कार्यात रस राहील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत.

धनु रास (Dhanu Zodiac)

मंगळाचा राशी बदल धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मंगळ या राशीतून कर्मस्थानात प्रवेश करणार आहे. या काळात नोकरदारांच्या पगारात वाढ झाल्याची बातमी मिळू शकते. बेरोजगार व्यक्तींना नवीन नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांना या काळात चांगली ऑर्डर मिळून मोठा नफा होईल. तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. 

मकर रास (Makar Zodiac)

कन्या राशीत मंगळ ग्रहाचा प्रवेश तुमच्यासाठी शुभ लाभ देणारा ठरणार आहे. तुमच्या घरी धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतात. व्यवसायात फायदा होऊ शकतो. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण होईल. क्रीडा जगताशी संबंधित लोकांसाठी काळ विशेष अनुकूल राहील. प्रगतीचा मार्ग खुला होईल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts