[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Chandrayaan-3 Debris : भारताने अलिकडेच चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं. इस्रोच्या चांद्रयान-3 च अवशेष ऑस्ट्रेलियाच्या (Australia) समुद्र किनाऱ्यावर आढळल्याची चर्चा आहे. ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनाऱ्यावर रहस्यमय वस्तू आढळली आहे. या रहस्यमयी वस्तूचा इस्रोच्या चांद्रयान-3 सोबत संबंध असल्याचा दावा काही नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या वस्तूची तपासणी करत आहे. काहींनी दावा केला आहे की, हे अवशेष भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेतील एक भाग असू शकतो.
ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळलं चांद्रयान-3 चे अवशेष?
पश्चिम ऑस्ट्रेलियातील ज्युरियन खाडीच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या एका रहस्यवस्तूमुळे सर्वांचं कुतूहल वाढलं आहे. ही वस्तू इस्रोच्या अलीकडेच प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-3 मोहिमेतील एक भाग असल्याचा अंदाज अनेकांनी लावला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी, सध्या समुद्र किनाऱ्यावर आढळलेल्या वस्तूची तपासणी करत आहेत. या तपासानंतर या वस्तूचं मूळ शोधण्यात मदत घेत आहे.
रहस्यमय वस्तूचं गूढ काय?
ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने सोमवारी ट्विटरवर समुद्र किनारी आढळलेल्या रहस्यमयी वस्तूचा छायाचित्र फोटो केला. यावेळी ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने ट्वीट करत म्हटलं की, ”आम्ही सध्या पश्चिम ऑस्ट्रेलियातील ज्युरियन बे जवळील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या या वस्तूशी संबंधित चौकशी करत आहोत. वस्तु इतर देशांच्या अंतराळ प्रक्षेपण मोहीमांचा भाग असू शकतो आणि आम्ही जागतिक समकक्षांशी संपर्क साधत आहोत, त्यांच्याकडून यासंदर्भात अधिक माहिती मिळण्यासाठी मदत होईल.”
Mysterious object found on Australian beach could be Chandrayaan-3 debris. 🛰️ 🚀 🇦🇺
The Australian Space Agency is investigating with global counterparts. #space #mystery #australia #chandrayaan3 pic.twitter.com/vilnFDRIo6
— Moidul Islam Borah (@moidul37) July 18, 2023
नेटकऱ्यांचे वेगवेगळे तर्क
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनारी सापडलेल्या रहस्यमयी वस्तूबाबत नेटकरी नवनवीन तर्क लावताना दिसत आहेत. सोशल मीडिया युजर्स याबाबत वेगवेगळे सिद्धांत मांडत आहेत. काही नेटकऱ्यांनी नुकत्याच लाँच झालेल्या चांद्रयान-3 मोहिमेशीही याचा संबंध असल्याचा दावा केला आहे. तर काही नेटकरी या रहस्यमयी वस्तूच्या उत्पत्तीचा अंदाज बांधत आहेत.
रहस्यमयी वस्तूबद्दल इस्रो प्रमुख काय म्हणाले?
एस. सोमनाथ यांनी बीबीसीला सांगितलं की, इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी सांगितलं की, ”ही वस्तू बर्याच काळापासून समुद्रात तरंगत असेल आणि शेवटी किनाऱ्यावर पोहोचली असेल. ही वस्तू रॉकेटचा भाग असल्याचे कोणतेही रहस्य नाही. हे PSLV रॉकेट किंवा इतर कोणतेही वस्तू असू शकते आणि जोपर्यंत आपण त्याबद्दल अधिक तपास करत नाही आणि त्याचे विश्लेषण करत नाही तोपर्यंत याबाबत स्पष्ट माहिती समोर येणार नाही,” असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, समुद्रावर आढळलेल्या अवशेषांपासून कोणताही धोका नसल्याचं ऑस्ट्रेलियन अंतराळ संशोधन संस्थेनं सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
[ad_2]