Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 21st May 2023 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील..

पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेसकडून आश्वासनपूर्ती 

कर्नाटकमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केलं आणि पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या पाचही आश्वासनांची पूर्ती केली आहे.  त्यानंतर राहुल गांधींनी लगेचच ‘जो हम कहते हैं, उसे पूरा करते हैं!’ असं ट्वीट केलं आहे. रविवारी बंगळुरूच्या खचाखच भरलेल्या श्री कांतीराव स्टेडियमध्ये सिद्धरामय्या (Siddaramaiah )यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  (वाचा सविस्तर)

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांना लुटणाऱ्या नीरज सिंह राठोडच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे मोबाईल नंबर

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे  आरोपी नीरज सिंह राठोड यांने तब्बल 28  आमदारांची फसवणूक केल्याची माहिती नागपूर पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे नीरज सिंहच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे फोन नंबर आढळून आले असून त्यातील तीन आमदारांनी ऑनलाईन पैसे पाठवल्याचंही तपासात समोर आले आहे.  महाराष्ट्र, गोवा आणि नागालँडसह पश्चिम बंगाल व झारखंड या राज्यातील काही आमदारांचे मोबाईल क्रमांक मिळाले आहेत. (वाचा सविस्तर)

राजस्थान सचिवालयाच्या तळघरात दोन कोटी रुपये आणि एक किलो सोन्याचं घबाड 

जयपूर योजना भवनात कोट्यवधी रुपयांचे सोने सापडल्याने खळबळ उडाली आहे. आरबीआयकडून शुक्रवारी 2,000 च्या नोटांवर बंदीची बातमी येताच, संध्याकाळी उशिरा जयपूरमध्ये दोन कोटींहून अधिक रोकड सापडली आहे. एकीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत  कर्नाटकच्या शपथविधीवेळी नव्या सरकारचे अभिनंदन करत आहेत, त्याचवेळी राजस्थान सरकारचे बारा वाजले आहेत. (वाचा सविस्तर)

news reels Reels

पाकिस्तानच्या घुसखोरी करणाऱ्या ड्रोन बीएसएफ जवानांनी पाडले

  पंजाबच्या अमृतसरमध्ये (Amritsar) आंतरराष्ट्रीय सीमेवर अंमली पदार्थांची तस्करी करणारे एक पाकिस्तानी ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (बीएसएफ) गोळीबार करून पाडले आहे. ही घटना  घडली. ड्रोनने वाहून आणलेला 2.6 किलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला आहे.पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे वारंवार होतोय घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. दोन दिवसांत जवनांनी चार ड्रोन पाडले आहेत. (वाचा सविस्तर)

नव्या संसदेचं उद्धाटन आणि सावरकरांच्या जन्मदिनाचा संबंध, योगायोग की मोदी सरकारची रणनीती?

तब्बल 1200 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीच्या  उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते या नव्या संसदेचं उद्धाटन होणार आहे.  नव्या संसदेचे उद्घाटन करण्यामागचं कारण मात्र स्पष्ट करण्यात आलं नाही. पण याच दिवशी भाजपसाठी स्मरणीय असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा  जन्मदिन साजरा केला जातो. त्यामुळे सावरकरांच्या जन्मदिनादिवशीच नव्या संसदेचं उद्घाटन करण्यात येत आहे. हा निव्वळ योगायोग आहे की मोदी सरकारची काही रणनीती आहे यावर आता चर्चा सुरू झाली आहे. (वाचा सविस्तर)

मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू 

जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका  पुन्हा एकदा गोळीबारानं हादरली आहे. उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एका अज्ञात बंदूकधारी व्यक्तीने  गोळीबार केला आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी आहेत. मेक्सिकोच्या बाहा कालिफोर्निया ( Baja California) ही घटना घडली आहे. (वाचा सविस्तर)

राजीव गांधी यांची तामिळनाडूमध्ये हत्या, दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांचे निधन, आज  इतिहासात

भारताच्या राजकीय इतिहासातील आजचा काळा दिवस आहे. आजच्याच दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. श्रीलंकेतील दहशतवादी संघटना एलटीटीईने त्यांच्यावर आत्मघातकी बॉंब हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. इतिहासात आजच्या दिवसातील इतर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया (वाचा सविस्तर)

 आजचा रविवार ‘या’ राशींसाठी आहे खास

आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. रविवारी मेष आणि वृषभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कर्क, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. त्याच वेळी, काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा रविवार कसा राहील, काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर)

[ad_2]

Related posts