Manipur Violence 5th Accused Arrested In Sexual Assault In Viral Video Case

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manipur Violence News:  मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारपर्यंत (21 जुलै) 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. 19 जुलै रोजी समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये दोन महिलांची एका समुदायाकडून विवस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर महिलांवर सामूहिक अत्याचार झाल्याचाही आरोप होता. 

मणिपूर पोलिसांनी ट्विट करून सांगितले की, व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 5 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी आणि दुःख व्यक्त केले आहे. 

4 आरोपींना 11 दिवसांची पोलीस कोठडी

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एका आरोपीबाबत पोलिसांनी सांगितले की, तो बी. फाइनोम गावात घडलेल्या घटनेत जमावाचा एक भाग होता आणि एका पीडित महिलेला खेचताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांनी या आरोपीला थौबल जिल्ह्यातून अटक केली असून हुइरेम हेरादास सिंग असे त्याचे नाव आहे.

दोन्ही पीडित महिला महिला कुकू समुदायाच्या आहेत. मैतई समुदायाच्या जवळपास 800 जणांच्या जमावानं या कुटुंबावर हल्लाबोल केला. त्यात या महिलेचा 19 वर्षांचा भाऊ आणि वडिलांची हत्या केली. त्यानंतर या दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढली. त्यातल्या 21 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचाही आरोप आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरच्या या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले.

मणिपूरमधील ही घटना आहे 4 मे रोजीची आहे. पण हा व्हिडीओ 19 जुलैपासून व्हायरल झाला. 21 जूनला गावच्या सरपंचानं याबाबत एफआयआर दाखल केली. पण त्यालाही एक महिने उलटूनही कुठे वाच्यता झाली नव्हती. आरोपींवर कारवाई होत नव्हती. अखेर या व्हिडीओनंतर संतप्त प्रतिक्रिया देशभरातून यायला लागल्या. त्यानंतर मणिपूर सरकारला जाग आली.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. आसाममधील विरोधी पक्षाने या घटनेसाठी आणि राज्यात सुरू असलेल्या अशांततेसाठी मणिपूर सरकारला जबाबदार धरले आहे. आसाम जातीय परिषदेचे (AJP) अध्यक्ष लुरिनज्योती गोगोई म्हणाले, “राज्यात संपूर्ण अराजकता आहे आणि तत्काळ हस्तक्षेप आवश्यक आहे. गुप्तचर यंत्रणेतील अपयश, अधिकाऱ्यांची मिलीभगत, राज्य आणि केंद्र सरकारची निष्क्रियता केवळ मणिपूरच्या लोकांसाठीच नाही तर देशातील सर्व नागरिकांसाठी वेदनादायक आहे, असेही त्यांनी म्हटले. 

आम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती करतो की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर सरकारला शांतता आणि सामान्य स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी त्वरित कारवाई करण्यासाठी योग्य निर्देश जारी करावे असे त्यांनी म्हटले. 

[ad_2]

Related posts