Scientist Predicts Asia And North America Might Be Collide And Form A New Supercontinent ; महासागर गायब होणार, दोन खंड एकत्र येणार; पृथ्वीवरील आजवरच्या सर्वात मोठ्या बदलाची भविष्यवाणी वाचा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वॉशिंग्टन: आज पृथ्वीवर सात खंड आहेत, पण भविष्यात खंडांची हीच संख्या कायम राहिल याची शाश्वती नाही. ही संख्या बदलण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञ रॉस मिशेल यांचे एक नवे पुस्तक प्रकाशित झाले असून ज्यात याचा तपशील देण्यात आला आहे.

‘द नेक्स्ट सुपरकॉन्टिनेंट’ या पुस्तकातून रॉस यांनी फक्त भुतकाळाची चर्चा केली नाही तर भविष्याबद्दल देखील सांगितले आहे. या पुस्तकातून त्यांनी जर सर्व खंड एकमेकांना जोडले गेले तर पृथ्वी कशी दिसेल याबद्दलदेखील चर्चा केली आहे. रॉस मिशेल यांनी या पुस्तकात इतिहासावर देखील प्रकाश टाकला आहे. हे सर्व खंड एकेकाळी एकत्र होते आणि त्यातून सुपरकॉन्टिनेंट्सची निर्मिती झाली होती.

साधारण ३०० ते २०० मिलियन वर्षापूर्वी पौंजिया सुपरकॉन्टिनेंट होते. डायनासोरचे अस्तित्व असल्याचा तो काळ आणि पृथ्वीचे केंद्र होते सध्याचे आफ्रिका होय. त्याच्या आधी म्हणजे एक अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीचा अधिक भाग हा उत्तर अमेरिका आणि ग्रीनलँड प्रमाणे होता. त्याच्या आधी दोन अब्ज वर्षे सायबेरिया केंद्रीयत पहिले सुपरकॉन्टिनेंट होते.

सध्याच्या खंडांची हलचाल पाहण्यासाठी त्याचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. शास्त्रज्ञ फिल्डवर्कच्या माध्यमातून एखाद्या पर्तवाचे वय निश्चित करतात. दोन खंडाची धडक होऊन नव्या खंडाची निर्मिती होते. भविष्यात अशा प्रकारे एक नवा खंड तयार होणार आहे. ज्यामुळे आर्क्टिक महासागर गायब होईल आणि अमासिया हा नवा सुपरकॉन्टिनेंट तयार होईल अशी भविष्यवाणी या पुस्तकात केली आहे. मिशेल यांच्या मतानुसार उत्तर अमेरिका आणि आशिया हे दोन खंड एकत्र आल्याने अमासिया या नव्या सुपरकॉन्टिनेंटची निर्मिती होईल. अर्थात रॉस मिशेल यांची भविष्यवाणी खरी होईल की नाही यासाठी आणखी काही कोटी वर्ष लागतील.

[ad_2]

Related posts