Manipur Violence Ground Report Rahul Kulkarni With Jivan Singh Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manipur Violence : केंद्राच्या मनात आलं असतं तर मणिपूरचा प्रश्न तीन दिवसात सुटला असता, पण केंद्राने तसं केलं नाही, राज्यानेही केंद्राचीच भूमिका कायम ठेवली… हा आरोप केलाय मणिपूरमधील मराठी माणसाने. मणिपूर हिंसाचार ज्यांनी जवळून पाहिलाय ते जीवन अभिराम लिंगथो उर्फ जीवन सिंह यांनी एपीबी माझाशी बोलताना सांगितलं की, या ठिकाणचा हिंसाचार हा सुनियोजित आहे. 

जीवन सिंह यांनी 20 वर्षे पुण्यामध्ये वास्तव्य केलं. त्यामुळे ते उत्तम मराठी बोलतात. मणिपूरमध्ये हिंसाचार झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणचा ग्राऊंड रिपोर्ट सांगितला. 

कुकी लोकांनी मैतेई लोकांवर अत्याचार केल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं. एका खोलीत अनेकांना बंद केलं आणि त्या खोलीत मिर्च्या जाळून त्यांना ठार करण्यात आल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं. अनेकांची घरं जाळण्यात आली. घरातून कुठे पळायचं हे अनेक महिलांना सूचलं नाही. त्यामध्ये अनेक गरोदर महिलांचा समावेश होता. 

मणिपूर हिंसाचारानंतर त्यातून वाचलेल्या नागरिकांची रिलिफ कॅंपमध्ये सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये 32 नवजात बालके आहेत, जी काहीच दिवसांपूर्वी जन्मलेली आहेत. याविषयी बोलताना जीवन सिंह म्हणाले की, या ठिकाणी असलेल्या अनेक जणांची घरं जाळण्यात आली, त्यांनी भीतीने घाबरून घर सोडलं. या ठिकाणी अनेक महिला आणि त्यांची मुलं आश्रयाला आहेत. या ठिकाणी असलेल्या महिलांचे पती एक तर गावीच स्वतःच्या घरांच्या रक्षणासाठी थांबले आहेत किंवा इतर ठिकाणी कँपमध्ये आहेत. 

मणिपूरची लोकं ही सर्वांना सामावून घेणारी आहेत असं सांगत ते म्हणाले की, मणिपूरमध्ये सध्या असलेला तणाव हा म्यानमारमधून आलेल्या लोकांमुळे निर्माण झाला आहे. मणिपूर सरकार आता कमकुवत झालं आहे, आता सर्व काही देवावर असून त्याच्याकडे नजरा लावून बसलो आहे. केंद्र सरकारने मनात आणलं असतं तर तीन दिवसात हा प्रश्न संपवला असता पण त्यांनी तसं केलं नाही आणि राज्य सरकारने केंद्राची भूमिका सुरू ठेवून हा प्रश्न मिटवला नाही. 

मणिपूरची लोकसंख्या ही 28 लाख इतकी आहे. त्यामध्ये 60 टक्के लोकसंख्या ही मैतेई समूदायाची आहे. त्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण हे अधिक आहे. कुकी आणि नागा लोकं ही बहुतांशी ख्रिश्चन आहेत आणि मैतेई लोकं ही हिंदू समूदायाची आहेत. त्यांच्यातील हा वाद असल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं. या ठिकाणची भूमी ही जवळपास 91 टक्के पर्वतीय आहे, उर्वरित भाग हा दऱ्यांचा आहे. या 9 टक्के जागेवर जास्तीत जास्त मणिपुरी लोक राहतात. 

मणिपूर दंगलीमुळे या ठिकाणच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं. रिलीफ कँपमध्ये किंवा त्याच्या जवळपास त्यांच्या शिक्षणाची सोय तात्पुरत्या स्वरुपात केली आहे. या ठिकाणी नीटची तयारी करत असलेली मुलगी ही 6 जूनपासून गायब आहे. ती कुठे गेली, तिचं काय झालं हे अद्याप कुणालाही माहिती नाही. 

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts