Womens beaten up, भयानक! वाहनांमधून लोखंडी रॉड, फावडी घेऊन ते आले, थेट घर खोदले, घराला आग लावली, महिलांना मारहाण केली – crime news the assailants dug up the house set it on fire and beat up the women to vent their old enmity

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

शाहजहानपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे जुन्या वैमनस्यातून काही जणांनी महिलांना बेदम मारहाण करून त्यांच्या घरांना आग लावली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या धक्कादायक घटनेबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) संजीव बाजपेयी यांनी माहिती दिली. कलान पोलीस ठाणे क्षेत्रातील लक्ष्मणपूर गावात राहणाऱ्या कांती देवी नावाच्या महिलेचा दुर्गेश तिवारी नावाच्या व्यक्तीसोबत वाद झाला होता. शनिवारी दुर्गेश त्याचे सहकारी मनोज मिश्रा, कुलदीप शर्मा आणि इतर मोठ्या संख्येने १५ वाहनांतून घरी पोहोचले. आरोपींनी लोखंडी रॉड आणि फावड्याने तिची भिंत पाडण्यास सुरुवात केली, नंतर त्यांनी आवारात असलेल्या झोपडीला आग लावली, अशी माहिती बाजपेयी यांनी दिली.

पापुआ न्यू गिनीमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत, पंतप्रधान जेम्स मारापे यांनी केला चरणस्पर्श
घरातील महिलांना केली मारहाण

हल्लेखोरांनी घरात उपस्थित महिलांनाही मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा आठ आरोपींसह अन्य अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

धक्कादायक! चोरीची माहिती पोलिसांना दिल्याचा राग, ८ जणांचा महिलेवर अमानुष अत्याचार
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिला किती सुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि विशेषत: महिलांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.

Mexico Firing : मेक्सिको हादरले, अज्ञाताने अचानक केला अंदाधुंद गोळीबार, १० लोकांचा मृत्यू

[ad_2]

Related posts