Opposition Parties Mumbai Meeting Updates Opposition Alliance India Next Meeting Will Be Held In Mumbai On 25 And 26 August

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Opposition Parties Mumbai Meeting: विरोधी पक्षांची आघाडी इंडियाच्या (INDIA) पुढील बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत (Mumbai) होणारी ही बैठक 25 आणि 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. पाटणा (Patna) आणि बंगळुरूनंतर (Bengaluru) विरोधी आघाडीची ही तिसरी बैठक आहे, ज्यामध्ये संयोजकांव्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) आव्हान देण्यासाठी 26 पक्षांनी मिळून महाआघाडीची स्थापना केली आहे.

या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया) असं नाव देण्यात आलं आहे. 23 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची पहिली बैठक झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीनंतर एकत्र आलेल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र निवडणुका लढविण्याबाबत चर्चा केली होती.

विरोधकांची यापूर्वीची बैठक बंगळुरूमध्ये झालेली

त्यानंतर 17-18 जुलै रोजी विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळुरूमध्ये झाली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस होती. बंगळुरूच्या बैठकीत विरोधी पक्षांनी त्यांच्या युतीला इंडिया म्हटलं जाईल, अशी घोषणा केली होती. ही घोषणा करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते की, पुढील लोकसभा निवडणुकीत इंडिया आणि भाजपप्रणित एनडीए यांच्यातच लढत होणार आहे.

“एनडीए आणि इंडिया यांच्यात स्पर्धा”

यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, आता लढत एनडीए आणि इंडिया यांच्यात आहे, पीएम मोदींची स्पर्धा आता इंडियाशी होईल आणि इंडियाच्या विरोधात कोणी उभं राहिलं तर कोण जिंकतं हे सर्वांनाच माहीत आहे. विरोधी पक्षांची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याचं मल्लिकार्जुन खर्गे यांनी दुसऱ्या बैठकीनंतर सांगितलं होतं.

समन्वयकाच्या नावावर निर्णय घेता येईल

पुढील बैठकीत समन्वय समिती स्थापन केली जाईल, ती समन्वयकाचे नाव ठरवेल, असंही खर्गे म्हणाले होते. विरोधकांचं म्हणणं आहे की, या बैठकांचा उद्देश भाजप विरोधी एकता निर्माण करणं आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला सामोरं जाण्यासाठी रणनीती आखणं हा आहे.

बैठकीत हे नेते झालेले सहभागी 

या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (यू)चे नेते नितीशकुमार उपस्थित होते. कुमार, द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही उपस्थित होते.

RJD प्रमुख लालू प्रसाद यादव, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काही इतर नेतेही या बैठकीला नेते उपस्थित होते.

[ad_2]

Related posts