[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Interim Bail To Vijay Darda : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप कोळसा घोटाळा (Coal Scam) प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपीला यांना दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) अंतरिम जामीन (Interim Bail) दिला आहे. दिल्लीतील विशेष कोर्टाने त्यांना बुधवारी (26 जुलै) दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती.
#Breaking Delhi HC grants interim bail to former Rajya Sabha MP Vijay Darda, his son Devendra Darda and another accused interim bail in the coal block allocation scam case.
They were convicted and sentenced by the trial court on Wednesday. #DelhiHighcourt #CoalScam pic.twitter.com/z6exLjWo4R
— Bar & Bench (@barandbench) July 28, 2023
विजय दर्डा यांचा चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
1999 ते 2005 या कालावधीमध्ये जेएलडी यवतमाळ यांना जे जुने ब्लॉक देण्यात आले होते त्याची माहिती लपवून पुन्हा यूपीए सरकारच्या काळामध्ये गैरमार्गाने कंत्राट मिळावल्याचा आरोप होता. यूपीए सरकारच्या काळात गाजलेल्या घोटाळ्यांमध्ये कोळसा घोटाळ्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. दिल्लीतील विशेष न्यायालयाने बुधवारी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह मुलगा देवेंद्र दर्डा आणि जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. चे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसंच याच प्रकरणात निवृत्त कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, दोन ज्येष्ठ अधिकारी के एस क्रोफा आणि के सी समरीया यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
13 जुलै रोजी दोषी सिद्ध
13 जुलै रोजी राऊज एवेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि पुत्र देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता, के एस क्रोफा, के सी सामरिया हे दोन प्रशासकीय अधिकारी, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जैस्वाल यांना दोषी ठरवलं होतं. विशेष न्यायालयाने त्यांना आयपीसीच्या कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवलं. या प्रकरणी शिक्षेची सुनावणी 18 जुलै रोजी होणार होती, परंतु 26 जुलै रोजी शिक्षा सुनावणी झाली. ज्यात त्यांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला.
छत्तीसगड कोळसा घोटाळ्यातील अनेक आरोपी तुरुंगात
छत्तीसगडच्या कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्याशी संबंध असलेले अनेक जण रायपूर तुरुंगात कैद आहेत. यात आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल यांचा समावेश आहे.
संबंधित बातमी
राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षांची शिक्षा, दिल्ली विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा
[ad_2]