Stapled VISA,’स्टेपल व्हिसा’बाबत भारताचा तीव्र विरोध; अरुणाचलच्या ३ खेळाडूंना चीनला जाण्यापासून रोखले, कारण… – india protested china’s issuance of stapled visas to some athletes from arunachal pradesh

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या काही खेळाडूंना चीनने स्टेपल व्हिसा दिल्याबद्दल भारताने गुरुवारी निषेध व्यक्त केला. हे अस्वीकारार्ह असल्याचेही भारताने म्हटले आहे. चीनकडे तीव्र शब्दांत निषेध नोंदविल्याची माहिती परराष्ट्रमंत्री अरिंदम बागची यांनी दिली. अशा कृतीला योग्य प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवला आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावले आहे.

चीनमध्ये येत्या सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार असून, त्यात सहभागी होणाऱ्या अरुणाचल प्रदेशच्या काही खेळाडूंना चीनने स्टेपल व्हिसा दिला आहे. ‘वैध भारतीय पासपोर्ट असलेल्या भारतीय नागरिकांसाठी व्हिसा प्रणालीमध्ये अधिवास किंवा वांशिकतेच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ नये, अशी आमची दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण भूमिका आहे,’ असे बागची यांनी म्हटले आहे.

घरात शिरुन माकडानं केळी फस्त केली, अवधूत गुप्तेंनी व्हिडिओ शेअर करत सांगितलं खुपणं

[ad_2]

Related posts