Student Beaten By Classmate In College; विद्यार्थ्याला टोळक्याकडून जबर मारहाण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या एका इंजिनीयरिंग कॉलेजच्या बाहेर काही विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. डझनभर मुलांनी तरुणाला बेल्ट, लाथाबुक्क्यांनी मारलं. गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थ्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तरुणाची प्रकृती नाजूक आहे. पोलिसांनी या प्रकरणात आठ विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे.कानपूरच्या महाराजपूरमध्ये असलेल्या इंजिनीयरिंग कॉलेजात फैझ एजाझ नावाचा विद्यार्थी दुसऱ्या वर्षात शिकतो. एजाझ अभ्यासात अतिशय हुशार असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. दिसायला देखणा असलेला एजाझ अतिशय शिस्तप्रिय आहे. कॉलेजकडून देण्यात येणारा सर्वोत्तम विद्यार्थ्याचा पुरस्कार चारच दिवसांपूर्वी त्याला देण्यात आला. त्यामुळे त्याच्या वर्गात शिकणारे अनेक विद्यार्थी नाराज होते. एजाझच्या वर्गातले अनेक विद्यार्थी त्याला त्रास द्यायचे. टोमणे मारायचे.
टायर पंक्चर झालाय वाटतं, जरा बघतेस का? होणाऱ्या अहोंची विनंती; एअरहोस्टेस खाली उतरली अन्..
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी एजाझ कॉलेजच्या कँटिनमध्ये गेला. तेव्हा तिथे आधीपासूनच काही विद्यार्थी बसले होते. त्यांनी एजाझला टोमणे मारण्यास सुरुवात केली. एजाझनं त्यांना विरोध केला. त्यानंतर आरोपी विद्यार्थ्यांनी एजाझला कँटिनच्या बाहेर नेऊन कॉलेज परिसरात बेदम मारलं. विद्यार्थ्यांनी त्याला पळवून पळवून मारलं.

एजाझ रस्त्यावर पडल्यानंतर आरोपींनी त्याला घेरलं आणि बेल्ट, लाथाबुक्क्यांनी मारलं. एजाझ बेशुद्ध पडला. त्याची शुद्ध हरपलेली पाहताच आरोपी विद्यार्थी त्याला तिथेच टाकून पळाले. कॉलेजच्या सुरक्षा रक्षकानं ना एजाझला वाचवलं, ना विद्यार्थ्यांना पडकलं, असा आरोप एजाझच्या कुटुंबियांनी केला. कॉलेज व्यवस्थापनानं एजाझला काशीराम रुग्णालयात दाखल केलं. मुलाची प्रकृती पाहून त्याला हॅलेटला रेफर करण्यात आलं. तिथून एजाझला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या एजाझ आयसीयूमध्ये दाखल आहे.
मी तुला जुगारात हरलोय, तू माझ्या मित्राच्या घरी जा! महिलेसोबत रात्री घडला धक्कादायक प्रकार
एजाझच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आठ विद्यार्थ्यांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या आठ विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. जखमी झालेला तरुण शुद्धीवर आल्यानंतर त्याचा जबाब नोंदवण्यात येईल, अशी माहिती कानपूर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी अशोक कुमार सिंह यांनी सांगितलं.

[ad_2]

Related posts