Missing Kerala Man Spotted Alive Day After Wife Held For His Murder; बायकोच्या भीतीनं नवरा दीड वर्ष गायब

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

थिरुअनंतपुरम: केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. एक व्यक्ती त्याच्या पत्नीच्या भीतीनं जवळपास दीड वर्ष गायब होता. पोलिसांनी ३४ वर्षांच्या पतीचा ठावठिकामा शोधून काढला. पत्नीच्या भीतीनं दीड वर्षांपासून लपून बसलो होतो, अशी माहिती त्यानं पोलीस चौकशीत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी ३४ वर्षांचा नौशाद बेपत्ता झाला. पथानामथिट्टाचा रहिवासी असलेला नौशाद इडु्क्की जिल्ह्यातील थोडुपुझाजवळ एका गावात राहत होता. नौशादनं दिलेल्या तक्रारीवरुन त्याची २५ वर्षीय पत्नी अफसानाला पोलिसांनी अटक केली.
भयंकर! स्कूटरला बांधून तरुणाला फरफटवलं; तालिबानी प्रकार पाहून पादचाऱ्यांच्या अंगावर काटा
पथानामथिट्टामधील कलंजूरचा रहिवासी असलेला नौशाद नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याच्या घरातून बेपत्ता झाला. या घरात तो भाड्यानं राहत होता. त्यानंतर तो थोम्मनकुथूमध्ये शेतात मजूर म्हणून काम करायचा. पत्नीला घाबरुन घर सोडल्याचं त्यानं पत्रकारांना सांगितलं.

पत्नी काही लोकांच्या मदतीनं मारहाण करत असल्याचा आरोप नौशादनं केला. त्यानंतर अफसानाला अटक करण्यात आली. पोलिसांची दिशाभूल केल्याच्या गुन्ह्याखाली तिला बेड्या ठोकण्यात आल्या. नौशादची हत्या केली असून त्याचा मृतदेह दफन केल्याचा दावा तिनं आधी पोलीस चौकशीत केला होता.
ती बागेत येणार याची कल्पना होती, सगळं ठरलं होतं; नर्गिसच्या मारेकऱ्यानं सगळंच सांगितलं
पोलीस अफसानाला अनेक ठिकाणी घेऊन गेले. मात्र कुठेही मृतदेह अथवा मानवी सांगाडे सापडले नाहीत. नौशाद बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी नोंदवली. नौशादच्या वडिलांनी त्याला दोन दिवसांपूर्वी कूडल रेल्वे स्थानकात पाहिलं होतं. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

[ad_2]

Related posts