What Happened On July 30th This Day In History Din Vishesh Today History Pune 2014 Malin Landslide Wardha River Flood 30th July 2022 Important Events

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

What Happened on July 30th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 30 जुलै रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी 1991मध्ये वर्धा नदीच्या महापुरात 204 गावकऱ्यांना मिळाली जलसमाधी होती. पुण्याजवळील माळीण गावावर 2014 मध्ये दरड कोसळली होती, यामध्ये 151 जणांचा मृत्यू झाला होता. या नकोशा आठवणी महाराष्ट्रातील लोकांना आजही आठवतात. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

204 गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधी

नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे 30 जुलै 1991 च्या पहाटे मोवाड परिसरात वर्धा नदीने रौद्ररूप धारण केले होते. त्यापूर्वीही या गावाने वर्धा नदीचे असंख्य पूर पाहिले होते… परंतु 1991 चा महापूर भयावह होता. त्यामुळे तेव्हाच्या वेदना आजही कायम आहेत. मोवाडसह वर्धा नदीच्या काठावरील 12 गावांसाठी त्या दिवशी वर्धा नदी कोपली होती. नदीचा नेहमीचा पाट त्या दिवशी प्रचंड विस्तारला होता. पाण्याने अवतीभवतीच्या शेकडो हेक्टर शेतीला गिळंकृत करत गावांमध्ये प्रवेश केले होते. त्यामुळे पहाटेच्या सुमारास बेसावध असताना पाण्याचा प्रवाह 204 जणांना सोबत घेऊन गेला होता. पुढील अनेक दिवस मोवाड आणि जवळच्या गावापासून कित्येक किलोमीटर लांब पर्यंत लोकांचे मृतदेह चिखलात आढळले होते. आज त्याच दुर्दैवी घटनेला 32 वर्षे पूर्ण झाली असून मोवाडवासी आज ही त्या घटनेच्या सावटातून बाहेर येऊ शकले नाही… 

“मोवाड हे सोन्याचे कवाड(दार)” ही म्हण संपूर्ण नागपूरात प्रसिद्ध होती..मोवाड हे गाव महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर वसलेले आहे…. मोवाड हे नरखेड तालुक्यातील गाव असून वर्धा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे… 30 जुलै 1991 रोजी रात्रभर सलग झालेल्या तुफान मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते. दिवस उजडण्या आधीच संपूर्ण मोवाड गाव जलमग्न झाले होते. झोपेत असलेल्या मोवाडवासियांना सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती.आणि लोक पाण्याचा लोट व त्यासह आलेल्या चिखलात वाहून गेले होते. पुढील अनेक दिवस मोवाड आणि जवळच्या गावापासून कित्येक किलोमीटर लांब पर्यंत लोकांचे मृतदेह चिखलात आढळले होते.

माळीण गावावर दरड कोसळली, 151 जणांचा मृत्यू – 

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात 30 जुलै 2014 रोजी माळीण दुर्घटना घडली. आजही ही घटना आठवली की अंगावर शहरे उभे राहतात. माळीण गाव क्षणार्धात गायब झाले होते. गावातील लोक झोपेत असतानाच पहाटे डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ गावातील 74 पैकी 44 घरे दाबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब झाले होते. 

रायगडच्या इर्शाळवाडीच्या घटनेनं हे वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झालं. डोंगराचा भाग कोसळून अख्ख गाव त्याखाली गाडलं जाण्याची ही काही पहिलीच घटना नाही. 30 जुलै 2014 ची रात्र पुण्यातील माळीणमध्येही अशीच घटना घडली होती. तो दिवस माळीणवासीय अजूनही विसरले नाहीत. पुणे जिल्ह्यात माळीण गाव होतं.  30 जुलै 2014 ची रात्र या गावासाठी अखेरची ठरली. एका रात्रीत गाव जमीनदोस्त झालं होतं.151 जणांचा मृत्यू तर शेकडो जनावरे दगावली आणि 30 जणांचा शोध लागलाच नव्हता.

पुनर्वसनासाठी नव्या जागेची शोध मोहीम सुरू झाली. माळीणच्याच लगतच्याच आमडे गावातील आठ एकर जागेचे 2015 साली भूसंपादनही झाले. 2 एप्रिल 2017ला नवं माळीण वसलं. पण दुर्दैवाने ही जागा डोंगराच्या उतारावरच मिळाली. त्यामुळंच प्रशासनाने आमचं आजचं मरण उद्यावर ढकललं, अशी खंत माळीणवासीय व्यक्त करत आहेत 

International Friendship Day

संपूर्ण जगभरात विविध देशांत विविध दिवशी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. 27 एप्रिल 2011 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेत 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या संमत करण्यात आला. पण भारतासोबतच अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

शंकर पाटील यांचं निधन – 

ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांचं आजच्याच दिवशी 1994 मध्ये निधन झालं होतं. साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक म्हणून त्यांची ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन्मलेले शंकर पाटील हे मराठी ग्रामीणकथा लिहिण्यासाठी प्रसिद्ध होते. ’चोरा मी वंदिले’, ’सागराचे पाणी’, ’सवाल’, ’बाजिंदा’ हे कथासंग्रह तसेच ’सरपंच’, ’इशारा’, ’घुंगरू’, ’कुलवंती’, ’बेईमान’, ’ललाट रेषा’, ’सुन माझी सावित्री’ या कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे.  

1973 : पार्श्वगायक सोनू निगम याचा जन्म.

भारतीय संगीत क्षेत्रातील सोनू निगम हे एक प्रसिद्ध नाव होय. हिंदी, मराठी आणि कन्नडशिवाय इतर भाषांमध्येही सोनू निगमने गाणी गायली आहेत. गायकीशिवाय त्याने अभिनयही केला आहे. 1973 मध्ये आजच्याच दिवशी सोनू निगम याचा जन्म झाला होता. आतापर्यंत त्याने सुमारे 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये 2000 हून अधिक गाणे गायले आहेत. बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांपैकी सोनू एक आहे. 2010 ते 11 च्या दरम्यानच्या बॉलिवूडमधील सिनेमातील प्रत्येक दुसरे गाणे सोनू निगमने गायले होते. त्याने लता मंगेशकर आणि खय्यामसारख्या भारतीय दिग्गजांबरोबर काम केले आहे.

आजच्या दिवशी घडलेल्या इतर घडामोडी
1909 : अमेरिकन वैमानिक आणि शास्त्रज्ञ राईट बंधू (Wright brothers) यांनी सैन्यांसाठी पहिले विमान तयार केले.
1928 : पद्मश्री पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्मदिन.
1962: ’ट्रान्स कॅनडा हायवे’ हा सुमारे 8,030 किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
2000: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.
2001 : राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंह यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर.
2003 : मुख्य निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह आणि सामाजिक कार्यकर्त्या शांता सिन्हा यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
2003 : संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी यशस्वी.
2006 : गेली ३५ वर्षे रेंगाळलेला आणि सुमारे आठ हजार कोटी रुपये खर्चून तयार झालेल्या टिहरी जलविद्युत प्रकल्पातून विजेच्या व्यावसायिक उत्पादनास प्रारंभ.
2012 : लंडन ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाज गगन नारंगने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कामगिरी केली.
2014 : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून 50 ठार.

[ad_2]

Related posts