BJP Leader Statement on NCP Split Sharad Pawar And Political Future of Jyotiraditya Shinde; राष्ट्रवादी फुटीचं कारण ते ज्योतिरादित्य शिंदेंचे भविष्य; भाजप नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : ‘शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबतीत जे केले त्यामुळे त्यांच्या कुटुंबात कलह निर्माण झाला व अजित पवार भाजप-शिवसेना सरकारसोबत आले. राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात, काँग्रेसला मध्य प्रदेशात आपली ‘जमीन’ सांभाळता आली नाही, त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भाजपने भरून काढली. यात भाजपचा दोष नाही. आपले घर सांभाळणे ही त्यांची जबाबदारी होती. पवारांच्या कौटुंबिक भांडणास भाजप जबाबदार कसा ठरतो,’ असा प्रश्न भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने शुक्रवारी उपस्थित केला. संसदेतील आपल्या दालनात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना या नेत्याने हे विधान केले.

महाराष्ट्र किंवा इतर राज्यांत भाजपने इतर पक्षांत फूट पाडली नाही. त्यांच्यात्यांच्यातील वादांमुळे नाराज झालेल्यांनी भाजपचा पर्याय स्वतःहून निवडला असा दावा या नेत्याने केला. मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याच दिवशी सकाळी तुम्हाला त्याबाबत समजेल असेही त्यांनी हसतहसत सांगितले. राज्यसभेत जे खासदार सक्षम आहेत व ज्यांची राज्यसभेची मुदत संपत आहे त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागेल. तो निर्णयही पक्ष उपलब्धता व क्षमता पडताळून घेईल, असे ते म्हणाले.

Weather Forecast: जुलैमध्ये महाराष्ट्राला झोडपणारा पाऊस कधीपर्यंत बरसणार? पुढील ४ दिवस अशी असेल राज्यातील स्थिती

राजस्थान, छत्तीसगड येथे भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही, असे सांगताना मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व केंद्राने नेमलेल्या निवडणूक समितीच्या व्यवस्थापनाखाली निवडणुका लढवल्या जातील असे या नेत्याने सांगितले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाच्या महत्त्वाकांक्षा दिल्लीतून तूर्त पूर्ण होणार नाहीत याचे संकेत दिले. तेलंगणसह तिन्ही राज्यांत जे निवडणूक प्रमुख (प्रभारी) आता नेमले आहेत ते लोकसभेवेळी बदलण्यात येतील असेही ते म्हणाले.

[ad_2]

Related posts