[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
प्रयागराजमधील सरोजिनी नायडू बालरोग रुग्णालयात आठ महिन्यांच्या बाळाला आणण्यात आलं. त्याचं पोट फार फुगलं होतं. ते पाहून डॉक्टर कोड्यात पडले. सुजेमागचं कारण शोधण्यासाठी त्यांनी सीटी स्कॅन केलं. सीटी स्कॅन रिपोर्ट पाहून डॉक्टरांचं संपूर्ण पथक हादरलं. आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटात आठ महिन्यांचंच एक भ्रूण होतं. त्याला डोकं, केस, हात, पाय होते. मात्र ते भ्रूण पूर्णपणे विकसित झालं नव्हतं.
यानंतर डॉक्टरांनी मुलाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जवळपास चार तास बाळाची शस्त्रक्रिया चालली. त्यानंतर बाळाच्या पोटातून भ्रूण काढण्यात आलं. डॉक्टरांनी मृत भ्रूण पॅथॉलॉजी विभागात पाठवलं. शस्त्रक्रियेनंतर बाळ सुखरुप असून ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. ‘हा प्रकार अतिशय दुर्मीळ आहेत. जगात आतापर्यंत अशा केवळ २०० घटना घडल्या आहेत,’ असं शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर डी. कुमार यांनी सांगितलं.
‘प्रतापगढ कुंडामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं पाच दिवसांपूर्वी त्याचं बाळ रुग्णालयात आणलं. त्याच्या जन्माच्या वेळी आईचा मृत्यू झाला. बाळाचं पोट फुगलं होतं. त्यामुळे त्याची प्रकृती नाजूक होती. सीटी स्कॅनमध्ये त्याच्या पोटात भ्रूण दिसलं. त्यानंतर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाळ आता सुखरुप आहे,’ अशी माहिती कुमार यांनी दिली.
हा प्रकार नेमका काय?
असा प्रकार अतिशय दुर्मीळ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. माझ्या वैद्यकीय कारकिर्दीत असा प्रकार पहिल्यांदाच पाहिल्याचं ते म्हणाले. ‘याला फिटस इन फिटस म्हटलं जातं. अंडाशयात कधी-कधी स्पर्म असल्यानं जुळी मुलं जन्माला येतात. काही वेळा जुळ्या मुलांपैकी एक आईच्या पोटात विकसित होतं. तर दुसरं मूल बाळाच्या पोटात जातं. ते तिथे विकसित होऊ लागतं,’ अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
[ad_2]