RBI Governor Shaktikant Das Reaction On 2000 Rupees Notes Said There Nothing To Worried About Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

RBI Governor Reaction on 2000 Rupees Notes: आरबीआयकडून (RBI) दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikant Das) यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दोन हजारांच्या नोटा बंद झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सर्वात पहिली प्रतिक्रिया दिली. दोन हजारांच्या नोटा चलनात आणण्याचे उद्दिष्ट आता पूर्ण झाले आहे, असं शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. 

आरबीआयचे गव्हर्नर दास यांची पहिली प्रतिक्रिया 

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, “नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी दिला आहे. त्यामुळे हा चार महिन्यांचा कालावधी लोकांनी गांभीर्याने घ्यावा. नागरिकांनी दोन हजारांच्या नोटांवर घातलेली बंदी ही कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करणारी आहे, असा अजिबात समज करु नये.” 

शक्तिकांत दास यांचे स्पष्टीकरण 

शक्तिकांत दास यांनी म्हटलं की,  “दोन हजारांच्या नोटा चलनात आणण्याची अनेक कारणं होती. त्यामुळे आता घेतलेला निर्णय हा काही निकषांमुळे घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन हजारांच्या नोटांवर घालण्यात आलेली बंदी ही नागरिकांनी गांभीर्याने घेतली तर चांगले होईल.” तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, “बँकांना दोन हजारांच्या नोटा बदलण्याचा डेटा तयार करावा लागेल आणि नोटांचा सर्व तपशील बँका तयार करतील.” तसेच दोन हजारांच्या नोटा बदलण्याची सुविधा ही सामान्यच असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.  दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे आणि बँकांमध्ये देखील पूर्ण तयारी करण्यात आली असल्याचं शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. 

दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा आरबीआयचा निर्णय 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (19 मे) संध्याकाळी दोन हजारांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्यात येणार असल्याची धक्कादायक घोषणा केली. याबरोबरच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये जाऊ शकतात. 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली. त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खरंतर, त्याच वर्षी RBI कायदा, 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत 2000 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या. इतर मूल्यांच्या नोटा बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर हे उद्दिष्ट साध्य करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

news reels Reels

[ad_2]

Related posts