India TV-CNX Poll Survey Predicts Opposition Alliance India Will Not Win Single Seat In Andhra Pradesh Goa Uttarakhand Gujarat North Eastern States Lok Sabha Election 2024 Survey

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha Election 2024 Survey: भाजपच्या (BJP) नेतृत्वात एनडीए (NDA) आणि विरोधकांची आघाडी इंडियानं (INDIA) आगामी लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Elections) तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राजकीय हालचालीही वाढू लागल्या आहेत. निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशातच, एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर आले आहेत. सर्वेक्षणातून समोर आलेली धक्कादायक आकडेवारीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

इंडिया टीव्ही-सीएनएक्स पॉल (India TV CNX Survey News) यांनी देशभरातील 543 लोकसभा जागांवर हे सर्वेक्षण केलं आणि लोकांना त्यांचे मत विचारले. सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे. आकडेवारीनुसार, चार राज्ये अशी आहेत जिथे विरोधी आघाडी इंडियाला एकही जागा मिळणार नाही. तसेच, हे सर्वेक्षण मणिपूर वगळता ईशान्येकडील 9 लोकसभेच्या जागांवर करण्यात आलं होतं, त्यापैकी इंडियाला एकही जागा जिंकता आलेली नाही.

गुजरात (Gujarat)

गुजरातमधील लोकसभेच्या 26 जागांवर केलेल्या या सर्वेक्षणात इंडिया एकही जागा जिंकणार नाही, असं म्हटलं होतं. त्याचबरोबर एनडीएला सर्व 26 जागा जिंकण्यात यश मिळाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.  

गुजरात : 26 जागा
एनडीए (NDA) : 26
INDIA : 0

आंध्रप्रदेश (Andhra Pradesh)

आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत, ज्यात इंडियाला एकही जागा मिळणार नसल्याचं सर्वेक्षणात दिसून आलं आहे. त्याचबरोबर राज्यात एनडीएच्या वाट्याला एकही जागा जाणार नाही, सर्व 26 जागांवर इतर पक्ष विजय होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आंध्रप्रदेश : 25 जागा
एनडीए (NDA) : 0
INDIA : 0
इतर : 25

उत्तराखंड (Uttarakhand)

सर्वेक्षणानुसार, उत्तराखंडमधील लोकसभेच्या 5 जागांपैकी इंडियाला एकही जागा जिंकता येणार नाही, तर एनडीए सर्व जागा जिंकू शकेल.

उत्तराखंड : 5 जागा
एनडीए (NDA) : 5
INDIA : 0

गोवा (GOA)

सर्वेक्षणानुसार, गोव्यातही इंडियाची स्थिती तशीच आहे, इथेही विरोधी आघाडीला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा एनडीए जिंकू शकतात.

गोवा : 2 जागा
एनडीए (NDA) : 2
INDIA : 0

ईशान्येकडील राज्य

मणिपूर (Manipur) वगळता ईशान्येकडील राज्यांतील 9 लोकसभेच्या जागांवर केलेल्या सर्वेक्षणानुसार, इंडियाला एकही जागा जिंकण्याची अपेक्षा नाही. मात्र, या सर्व 9 जागा एनडीएकडे जाऊ शकतात.

मणिपूर वगळता ईशान्येकडील राज्य : 9 जागा
एनडीए (NDA) : 9
INDIA : 0

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

India TV CNX Survey: सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होऊन मोदी नेहरुंची बरोबरी करणार? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष

[ad_2]

Related posts