Power Banks Top List Of Seized Items At Airport In India Know In Detail News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Airports in India : सध्याच्या काळात इलेक्ट्राॅनिक साधनांशिवाय कोणाचे पान देखील हालत नाही. प्रत्येक ठिकाणी जाताना  लोक  इलेक्ट्राॅनिक साहित्य सोबत ठेवतात. अनेकदा लोक प्रवास करताना मोबाईल चार्ज करण्याकरता आपल्या सोबत पाॅवर बँक ठेवतात. मात्र तुम्ही जर विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या चांगलीच कामी पडणार आहे. विमानतळांवर अनेक गोष्टी या जप्त केल्या जातात. मात्र या जप्त केलेल्या वस्तूंच्या यादीत पाॅवर बॅक पहिल्या स्थानावर आहे. 

ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने (बीसीएएस) सोमवारी सांगितले की, देशभरातील विविध विमानतळांवर दररोज सुमारे 25,000 प्रतिबंधित वस्तू जप्त केल्या जातात. ब्युरोचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी दिल्लीतील BCAS मुख्यालयात विमान वाहतूक सुरक्षा संस्कृती सप्ताह-2023 चे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही देशातील सर्व विमानतळांवर दररोज सुमारे आठ लाख हँडबॅग आणि पाच लाख चेक इन बॅगेज तपासतो. तपासणी करत असताना, आम्हाला सुमारे 25,000 प्रतिबंधित वस्तू सापडतात. ज्यामुळे सुरक्षा कर्मचार्‍यांचा वेळ वाया जातो. याचा परिणाम विमानतळाच्या सुरक्षेवरही होत आहे.”

सर्वाधिक पॉवर बँका जप्त केल्या आहेत

BCAS ने सांगितले की चेक-इन बॅगेजमध्ये जप्त केलेल्या प्रतिबंधित वस्तू बहुतेक वेळा पॉवर बँक (44 टक्के), लाइटर (19 टक्के),  बॅटरी (18 टक्के) आणि लॅपटॉप (11 टक्के) आहेत. लाइटर (26 टक्के), कात्री (22 टक्के), चाकू (16 टक्के) इतक्या गोष्टी आजवर जप्त करण्यात आल्या आहेत.

हसन म्हणाले की, “आम्ही एकाही चुकीकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक आठवडाभराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. भारतात विमानाने पहिल्यांदा प्रवास करणाऱ्यांची संख्या संपूर्ण जगात जास्त आहे. त्यांनी सांगितले की, एका दिवसात  4.8 लाख प्रवासी 3300 फ्लाइट्समधून प्रवास करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व गोष्टींवर काम करत आहोत. प्रवाशांसोबतच सुरक्षेसोबतच आम्ही विमानतळाच्या लँडसाईड भागातील लोकांच्या सुरक्षेचीही काळजी घेत आहोत.”

पॉवर बँक ठेवण्याचा नियम काय आहे?

पॉवर बँकांमध्ये लिथियम-आयन बॅटरी असतात, ज्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने धोकादायक मानल्या आहेत. लिथियम आयन बॅटरी योग्यरित्या हाताळल्या नसल्यास स्फोट होण्याचा धोका असतो.100Wh (वॅट-तास) पेक्षा कमी क्षमतेच्या पॉवर बँका केबिन बॅगेजमध्ये ठेवल्या जाऊ शकतात. 100Wh आणि 160Wh दरम्यान क्षमतेच्या पॉवर बँक्स नेण्यासाठी एअरलाइनची परवानगी आवश्यक आहे. 160Wh पेक्षा जास्त क्षमतेच्या पॉवर बँकांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या

[ad_2]

Related posts