Haryana Nuh Violence Stone Pelting Reported In Gurugram Sohna Section 144 Imposed In District

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nuh Violence: हरियाणाच्या (Haryana News) मेवात जिल्ह्यातील नूहमध्ये जातीय तणावाच्या प्रकरणी परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम आहे.विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या वतीने काढण्यात आलेल्या जलभिशेषक यात्रेच्या दरम्यान ह प्रकार घडला आहे.  जलाभिषेक रोखण्याचा प्रयत्न करणारा जमाव आणि यात्रेतील भाविक यांच्यात झालेल्या हिंसाचारात दोन होमगार्डचा मृत्यू झाला आहे. तर दहापेक्षा अधिख पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. नूहसह हरयाणाच्या काही जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.  या संघर्षानंतर मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. नूहच्या रस्त्यांवर सातत्याने फ्लॅग मार्च काढला जात आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नूहमध्ये जातीय हिंसेनंतर जवळच्या गुरुग्राम जिल्ह्यातील सोहना येथे जाळपोळ सुरू झाली. चार वाहने आणि एका दुकानाला आग लावण्यात आली आहे. रस्त्यांवर सातत्याने फ्लॅग मार्च काढला जात आहे. गुरुग्रामचे उपयुक्त निशांत कुमार यादव आणि फरीदाबाद पोलीस आयुक्त विकास कुमार अरोरा यांनी प्रक्षोभक प्रतिक्रिया देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि भावना भडकवणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे आहे.

फरीदाबाद जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 2 ऑग्स्टपर्यंत बंद

नूह येथे झालेल्या हिसांचारानंतर फरीदाबाद जिल्ह्यातील पोलीसांनी अलर्ट जारी केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग सेंटरला सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच फरीदाबाद जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट रात्री 11.30 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. फरीदाबाद जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नूह येथे जवळपास 12 ते 13 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांपैकी आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर मेदांता रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत .

हे ही वाचा :

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर ठाण्यात मोठी दुर्घटना, गर्डरसह क्रेन कोसळली, 15 मजुरांचा मृत्यू

 



[ad_2]

Related posts