[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Bhandara News : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे त्यांना पक्ष विस्तार आणि बळकटी आधीच धक्का बसला आहे. अपात्रतेची टांगती तलवार असलेले भंडारा जिल्हा परिषदचे (Bhandara ZP) उपाध्यक्ष आणि बीआरएस पक्षाचे संदीप ताले यांनी अन्य दोन जिल्हा परिषद सदस्यांसह आज नाट्यमयरीत्या भाजपात (BJP) प्रवेश केला. यामुळे भंडारा जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. संदीप ताले हे बीआरएस पक्षाचे विदर्भाचे नेते माजी आमदार चरण वाघमारे यांचे खंद्दे समर्थक म्हणून ओळखले जातात.
संदीप ताले यांच्यासह उमेश पाटील आणि धृपदा मेहर या अन्य दोन अशा तिघांनी भाजपात प्रवेश केला. भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. 52 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 21 सदस्य असून एक अपक्ष आणि भाजपचे बंडखोर नेते माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाच्या पाच सदस्यांना घेवून काँग्रेसनं सत्ता काबीज केली आहे. दरम्यान, भाजपनं चरण वाघमारे गटाच्या पाच सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत याचिका दाखल केली आहे. त्या कारवाईची टांगती तलवार असल्याने यापूर्वी दोघांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर, आज तिघांनी प्रवेश केला. या प्रवेशानं बीआरएस पक्षाचे नेते चरण वाघमारे यांना जबर धक्का बसला आहे.
भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्या उपस्थितीत या तिघांनी आज नागपूर इथं भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे, काँग्रेस मध्ये सत्तेत सहभागी असताना काँग्रेसला सोडून पाच जणांनी भाजपात प्रवेश केला असला तरी, भाजपाकडे विश्वासदर्शक ठरावाच्या आवश्यक असलेला 35 हा आकडा जुळत नसल्यानं जिल्हा परिषद मधील काँग्रेसच्या सत्तेला सध्यातरी धोका नाही.
भंडारा जिल्हा परिषदेचे संख्याबळ
एकूण सदस्य संख्या – 52
बहुमताचा आकडा – 27
————————————
सत्ताधारी पक्ष संख्या – 27
———————————-
काँग्रेस सदस्य संख्या – 21
चरण वाघमारे गट – 05
अपक्ष – 01
————————————
विरोधी पक्षाचा आकडा – 25
————————————–
राष्ट्रवादी काँग्रेस संख्या – 13
भाजप संख्या – 07
अपक्ष – 03
बसपा – 01
शिवसेना – 01
—————————————-
विरोधी पक्षात अगोदरचे 25 आणि आता चरण वाघमारे गटाचे सहभागी झालेले 05 सदस्य. असे एकूण 30 संख्या होत आहे. त्यामुळे अविश्वासदर्शक ठरावासाठी 35 सदस्यांची गरज असल्यानं आणखी 05 सदस्य कमी पडत असल्यामनं काँग्रेसच्या सत्तेला धोका नाही.
[ad_2]