Manipur Violence Imapact On State GST Gst Collection Falls By 30 Percent In July 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manipur Violence and GST :  मणिपूरमध्ये हिंसाचार भडकून तीन महिने झाले असून, राज्यातील हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. या हिंसाचारात 160 लोकांना आपला जीव गमवावा लागला असून हजारो लोक बेघर झाले आहेत. प्राण वाचवण्यासाठी हजारो लोकांना निर्वासित शिबिरात राहावे लागत आहे. मणिपूरमधील हिंसाचाराचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या जुलै 2023 च्या जीएसटी संकलनाच्या आकडेवारीनुसार, मणिपूर या एकमेव राज्याचे जीएसटी संकलन घटले आहे.

जीएसटी संकलनात मोठी घट

जीएसटी संकलनाची राज्यनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. जुलै 2023 मध्ये, मणिपूरमधील जीएसटी संकलन 42 कोटींवर आले आहे. जुलै 2022 च्या तुलनेत 7 टक्क्यांनी कमी आहे. तर, मागील महिना, जून 2023 च्या तुलनेत जीएसटी संकलनात 30.61 टक्क्यांची घट झाली आहे. जून 2023 मध्ये मणिपूरचे जीएसटी संकलन 60.37 कोटी रुपये इतके होते.

मणिपूरच्या कापडांना मोठी मागणी आहे

मणिपूर हिंसाचारामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होताना दिसत आहे. मेईतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारामुळे, मणिपूरमधील निर्यात 80 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. हाताने तयार केलेले कपडे, औषधी वनस्पती आणि अनेक खाद्यपदार्थ राज्यातून निर्यात केले जातात. मणिपूर हे मोइरांगफी, लीराम, लासिंगफी आणि फणेक यांसारख्या कापडांसाठी ओळखले जाते आणि या कापडांना अमेरिका, युरोप आणि सिंगापूरमध्ये चांगली मागणी आहे. मात्र, राज्यात हिंसाचार पसरल्यानंतर तेथे इंटरनेट बंद झाल्याने तेथील अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. बँकांपासून ते एटीएम तेथे बंद आहेत.

अर्थव्यवस्था रुळावर कधी येणार?

भारत-म्यानमार तसेच इतर आग्नेय आशियाई देशांसोबतच्या व्यापाराचा मार्ग असलेला मोरेह पॉईंट सध्या बंद आहे. त्यामुळे मणिपूरच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. विणकरांच्या संख्येच्या बाबतीत मणिपूर हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि यंत्रमागाच्या संख्येच्या बाबतीत चौथे राज्य आहे. मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये वाढलेल्या अविश्वासाच्या दरीमुळे राज्याची अर्थव्यवस्था कधी रुळावर येईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जुलै महिन्यात एक लाख 65 हजार कोटींचे जीएसटी संकलन

जुलै 2023 मध्ये 1,65,105 कोटी रुपयांचे GST संकलन झाले आहे. जुलै 2022 च्या तुलनेत 11 टक्के अधिक आहे. जीएसटी अस्तित्वात आल्यापासून, ही सलग पाचवी वेळ आहे. जेव्हा जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. जीएसटी संकलनात सीजीएसटी (सीजीएसटी) 29,773 कोटी रुपये, एसजीएसटी (एसजीएसटी) रुपये 37,623 कोटी आणि आयजीएसटी (आयजीएसटी) रुपये 85,930 कोटी आहे.

[ad_2]

Related posts