Lok Sabha Election 2024 India Tv Cnx Survey On West Bangal Mamata Banerjee Tmc Seats Prediction Opinion Poll Results Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha Election Opinion Poll: देशात 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) होणार आहेत. याआधीच विरोधी पक्षांच्या इंडियानं सत्ताधाऱ्यांच्या एनडीएच्या विरोधात 26 पक्षांची विरोधी आघाडी स्थापन केली आहे. अशा स्थितीत 2024 ची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे. या दोघांमध्ये पुढील वर्षी कडवी स्पर्धा अपेक्षित आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकांचा कल जाणून घेण्यासाठी इंडिया टीव्ही सीएनएक्सनं (India TV CNX Survey) एक सर्वेक्षण केलं होतं, ज्याचा निष्कर्ष समोर आला आहे. 
 
सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार, सध्याचा सत्ताधारी पक्ष एनडीए पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करतेय. सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 318 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर काँग्रेससह विरोधी आघाडी इंडियाला लोकसभेच्या 175 जागा मिळू शकतात. तसेच, प्रादेशिक पक्षांसह, इतर पक्ष 50 जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. मात्र, या सगळ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या पक्षाच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय? 

इंडिया टीव्ही सीएनएक्स सर्वेक्षणानुसार, सत्ताधारी भाजपला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लोकसभा निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये भाजपला स्वबळावर 303 जागा मिळाल्या होत्या, तर या सर्वेक्षणात पक्षाला 290 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसबद्दल बोलायचं झालं यंदाच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो, तसेच 2019 च्या तुलनेत जागाही वाढू शकतात. सर्वेक्षणात काँग्रेसला एकूण 66 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर 2019 मध्ये काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या.

आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्ष वायएसआर काँग्रेस लोकसभेच्या जागांच्या बाबतीत देशातील चौथा सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज आहे. सीएम जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्यावेळच्या तुलनेत वायएसआर काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत 7 जागा कमी मिळू शकतात. 2019 मध्ये वायएसआर पक्षाला 22 जागा मिळाल्या होत्या. तर बीजेडी पक्षाला गेल्या वेळेच्या तुलनेत एका जागेचा फायदा होऊ शकतो. सर्वेक्षणात बीजेडीला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणात टीएमसी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष 

सर्वेक्षणाच्या निकालानुसार, पश्चिम बंगालमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाचंच वर्चस्व पाहायला मिळू शकतं. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी टीएमसीच्या लोकसभेच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. टीएमसीच्या सात जागा वाढण्याचा अंदाज आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 22 जागा मिळाल्या होत्या. 

सर्वेक्षणानुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत टीएमसीला 29 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला एक, भाजपला 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. हा अंदाज खरा ठरला तर 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष भाजप आणि काँग्रेसनंतर देशातील तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरेल.

सर्वेक्षणात NDA-INDIA यांना मिळाल्यात किती जागा? 

एनडीए : 318
इंडिया : 175
अन्य : 50

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदींची जादू पुन्हा चालणार? ताज्या सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष समोर, भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पारड्यात किती जागा?

[ad_2]

Related posts