( प्रगत भारत । pragatbharat.com)
What is Egg Freezing: जगाच्या पाठीवर घडणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या घटनेकडे विविध दृष्टीकोनांतून पाहिलं जात आहे. तैवानमध्ये घडणाऱ्या एका घटनेचाही याच समावेश असून, तेथील महिला नेमका हा निर्णय का घेत आहे हा प्रश्न अनेकांच्याच भुवया उंचावत आहे. जागतिक घडामोडींमध्ये चर्चेत असणाऱ्या एका वृत्तानुसार तैवानमधील महिलांचा कल Egg Freezing कडे असल्याचं स्पष्ट होत आहे.
वस्तुस्थिती समजून घ्या…
तैवानमधी ही परिस्थिती लक्षात घ्यायची असेल तर सर्वप्रथम 33 वर्षीय ब्रँड डिरेक्टर विवियन तुंग यांच्या कामाकडे लक्ष द्यावं लागेल, कारण त्या घरातील एका खोलीत या प्रक्रियेवर काम करतात. या प्रक्रियेमध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून पोटावर एक जागा शोधत त्या हार्मोनल मेडिसिन रेकोवीले इंजेक्ट करतात. थोडक्यात एक असं इंजेक्शन घेतात ज्यामुळं एग प्रोडक्शन वाढतं.
बदलत्या जीवनशैलीमुळं अनेक महिलांना गर्भधारणेत अडचणी येतात. याच अडचणी उदभवू नयेत यासाठी तैवानमधील महिला एग फ्रिजिंगचं पाऊल उचलत आहेत. पण, या गोठवलेल्या Eggs चा वापर त्या लग्न होईपर्यंत करू शकत नाही, असं तिथला कायदा सांगतो.
तैवानमधील महिलांना जोडीदार नकोय?
तैवानमधील महिला स्वतंत्र्य असून, त्या स्वबळावर आयुष्य जगण्याला प्राधान्य देत आहेत. या साऱ्यामध्ये त्या करिअरवरही केंद्रित करत आहेत. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे तैवानमधील महिला जोडीदाराच्या शोधातही नाहीत आणि त्यांना लग्नाची घाईसुद्धा नाही. तैवानमध्ये महिलांमध्ये असणारा प्रजनन दर 0.89 टक्के इतका आहे. जो जगातील सर्वाधिक कमी प्रजनन दरांपैकी एक आहे. एकंदर राहणीमान, जोडीदाराची गरज आणि शारीरिक बदल या सर्व गोष्टींचा विचार करता तैवानमध्ये अनेक महिला हा पर्याय निवडताना दिसत आहेत.
एग फ्रिजिंग म्हणजे काय?
एक फ्रिगिंज ही एक अशी प्रक्रिया आहे जिथं महिलेच्या अंडाशयातून मॅच्योर eggs बाहेर काढली जातात आणि ती प्रयोगशाळेत शुन्याहून कमी तापमानाच गोठवली जातात. भविष्यात जेव्हा केव्हा महिलेला गर्भधारणा करण्याची इच्छा असते तेव्हा त्यांना मातृत्त्वाचं सुख अनुभवता येतं. या उपायामुळं वाढत्या वयातही महिलांना गर्भधारणा शक्य होते. भारतात अद्यापही एग फ्रिजिंगबाबत बरेच पूर्वग्रह असले तरीही आता या संकल्पनेला मान्यता मिळताना दिसत आहे. अभिनेत्री काजोलची बहीण, तनिषा मुखर्जी हिनंही एग्स फ्रीज करण्याचा निर्णय घेतला होता.