Nitin Desai suicide : नितीन देसाई कोणामुळे अडचणीत? चौकशी होणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

विधानसभेत गुरुवारी नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणाबाबत चर्चा झाली. यावेळी सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्र येत नितीन देसाई यांना न्याय देण्याची मागणी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

नितीन देसाई यांच्या ऑडिओ क्लीप्सची सध्या तपासणी सुरु आहे. कर्जाच्या व्याजाचा दर, वृद्धी दर आणि वसुलीची पद्धत याची केवळ साधी चौकशी होता कामा नये. रसेश शहा, एआरसी आणि एडलवाईज यांची विशेष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली.

विधानसभेत नितीन देसाई मृत्यूप्रकरणाची चर्चा सुरु असताना आशिष शेलार यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. नितीन देसाई यांनी बुधवारी पहाटे एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर खालापूर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. याप्रकरणी एन.डी. स्टुडिओत फॉरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट टीमकडून तपास करण्यात आला.

नितीन देसाई यांनी एन.डी. स्टुडिओच्या ४३ एकर जमिनीवर १८० कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. या १८० कोटी रुपयांचे २५२ कोटी झाले. एडलवाईज समूहाचे सीईओ रसेश शहा यांच्या असेट रिक्रेशन कंपनीचे हे पहिले प्रकरण नाही. ही आधुनिक सावकारी आहे.

असेट रिक्रेशन कंपनीने नितीन देसाई यांना दिलेल्या कर्जावर आकारलेल्या व्याजाचा दर आणि पद्धत याची सखोल चौकशी झाली पाहिजे. केवळ अपघाती मृत्यूची चौकशी होता कामा नये. नितीन देसाई मृत्यूप्रकरणात एआरसी कंपनी आणि रसेश शहा यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यासाठी वेळ पडल्यास विशेष चौकशी करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

 एआरसी कंपनीने कुठेही जाणीवपूर्वक फसवले का? एन.डी. स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी नितीन देसाई यांच्यावर दबाव आणण्यात आला का? जोरजबरदस्ती झाली का? कंपनीने नियमाबाहेर जाऊन व्याज आकारलं का? देसाई यांना फसवण्यात आले का?, याची चौकशी केली जाईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

एन.डी. स्टुडिओ हा एका मराठी माणसाने उभारला आहे. आताच काही ठोस घोषणा करता येणार नाही. पण एन.डी. स्टुडिओचं संवर्धन करता येईल का? सरकारला तो टेकओव्हर करता येईल का, याबाबत विचार केला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


हेही वाचा

Nitin Desai Suicide Update: पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

प्रसिद्ध मराठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

[ad_2]

Related posts