Curry Leaves Water Health Benefits Reduce 7 Dangerous Health Issues; कढीपत्ता पाण्यात उकळून पिण्याचे ७ आरोग्यदायी फायदे, Body Detox सह ६ आजार होतील दूर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​कढीपत्त्यामध्ये असणारे जीवनसत्त्वे

​कढीपत्त्यामध्ये असणारे जीवनसत्त्वे

कढीपत्त्यात शरीरासाठी आवश्यक असलेली अनेक जीवनसत्त्वे जसे की ए, बी, सी, ई तसेच फायबर, लोह, प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस यांसारखी खनिजे असतात. इतकेच नाही तर ते वेदना कमी करणारे, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीडायबेटिक गुणधर्मांनी समृद्ध आहेत. कढीपत्ता उकळवून प्यायल्याने त्याचे संपूर्ण फायदे तुमच्या शरीराला पाण्याद्वारे उपलब्ध होतात, ज्यामुळे ते आश्चर्यकारक फायदे देतात.

रोगप्रतिकार शक्ती वाढेल

रोगप्रतिकार शक्ती वाढेल

अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक गुणधर्मांनी समृद्ध, कढीपत्ता पाणी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. सर्दी आणि खोकल्यासारख्या संसर्गापासून ते तुमचे संरक्षण करते. तसेच विषाणूजन्य ताप आणि इतर अनेक समस्यांपासून दूर राहते.

​मळमळ कमी होते

​मळमळ कमी होते

मॉर्निंग सिकनेस आणि सकाळी मळमळण्याची समस्या अनेकांना असते. पण कढीपत्ता उकळवून प्यायल्याने उलट्या, जुलाब आणि मळमळ यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.

(वाचा – जास्त पाणी प्यायल्यामुळे महिला चक्क रुग्णालयात दाखल, जाणून घ्या एका दिवसात किती पाणी प्यावे?)

​अशक्तपणा कमी होतो

​अशक्तपणा कमी होतो

लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने कढीपत्त्याचे पाणी ऍनिमियाच्या उपचारात खूप फायदेशीर आहे. यासोबतच यामध्ये फॉलिक अॅसिडही असते. हे दोन्ही पोषक घटक रक्तातील ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनचे स्तर सुधारण्यास मदत करतात.

​(वाचा – Zomato CEO दीपिंदर गोयलचा जबरदस्त Weight Loss, १५ किलो वजन घटवून शेअर केला ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो)

​शरीर डिटॉक्स करते

​शरीर डिटॉक्स करते

उकडलेले कढीपत्त्याचे पाणी हे उत्तम डिटॉक्स पेय आहे. तसेच शरीरातील घाण, हानिकारक कण आणि विषारी पदार्थ बाहेर काढून रक्त शुद्ध करते. हे वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

​(वाचा – जास्त घाम येणे हे Diaphoresis या जीवघेण्या आजाराचे लक्षण तर नाही? या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष)​

डायबिटिस कंट्रोलमध्ये राहते

डायबिटिस कंट्रोलमध्ये राहते

सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता उकळून पिणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यासोबतच कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करून हृदयविकारांना दूर ठेवण्यासही हे उपयुक्त आहे.

​(वाचा – दीर्घकाळ काम केल्यामुळे लोअर बॅक पेन आणि मान दुखीच्या त्रासावर ७ रामबाण उपाय, दुखणं होईल छुमंतर)​

​मन शांत राहते

​मन शांत राहते

कढीपत्त्यामुळे चिंता, तणाव यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हे तुमच्या नसा आणि मनाला शांत आणि आरामदायी वाटते. त्यामुळे तुमचा मूड सुधारण्यास मदत होते.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts