Sirvi Society Banned Pre Wedding Shoot;सिरवी समाजाकडून प्री वेडिंग शूटला बंदी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जयपूर : लग्नाआधी (Marriage) प्री वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करणं ही तरुणाईची फॅशन बनलीये. आताच्या तरुणाईला प्री वेडिंगची भुरळ जास्त प्रमाणात दिसून येते. मात्र आता यावर राजस्थानमधील सिरवी समाजाने (Seervi Samaj) आक्षेप नोंदवले आहेत. यावर होणारा वायफळ खर्च टाळता यावा यासाठी या समाजाने प्री वेडिंगविरोधात आवाज उठवला आहे. याबरोबरच लग्नाआधी मुलगा-मुलगी एकत्र बाहेर जाण्यावरही बंदी घातली आहे. हा निर्णय सिरवी समाज परगना समितीने घेतला आहे. सिरवी समाजाच्या पदधिकाऱ्यांनी प्री वेडिंग शूट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याचे सांगून प्री वेडिंगवरच बंदी घातली आहे.सिरवी समाज परगना समितीने पालीच्या सोनाई मांझी गावात एक बैठक घेतली होती. या बैठकीत लग्नात होणारे वायफळ खर्च कमी करण्यावर चर्चा झाली. तसेच वरातीमध्ये डीजे आणि हळदी समारंभावर बंदी घालण्याबरोबरच नवरदेवाला आता या कार्यक्रमात क्लीन शेव करुन येण्याचा नियम बनवला आहे. सोनाई मांझीमध्ये सिरवी समाज परगना समितीच्या बैठकीत उपस्थित समाजबंधूंनी एकमताने हा निर्णय घेतला आहे.

समितीच्या पट्ट्यात जेवढी पण गावे आहेत, त्या गावात राहणारे लोक त्यांच्या मुलांचे लग्नाआधी प्री वेडिंग शूट करणार नाहीत. तसेच लग्नाआधी मुलगा-मुलगी बाहेर फिरण्यास पाठवणार नाहीत, अशी तंबीच समितीने दिली आहे. लग्नाआधी वर-वधूच्या फोटो शूट आणि व्हिडिओ शूटवर पूर्णपणे बंदी राहील तसेच लग्न होईपर्यंत मुलगा-मुलगी फिरायला जावू शकत नाहीत. याबरोबरच वराला क्लीन शेव करुन यावं लागणार आहे, अशा जाचक नियम अटी समितीने घातल्या आहेत.

लग्नात हळदीच्या समारंभावर निर्बंध राहतील. तसेच लग्नात वरातीत वाजणाऱ्या डीजेवरही बंदी राहणार आहे. या सर्व नियमांचे गुरू पोर्णिमेनंतर पालन करणे गरजेचे आहे. सोनाई मांझीच्या कुकाराम कुटुंबाच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत मीडिया प्रभारी जगदीश भायल, गंगाराम काग, मोहनलाल सोलंकी, मानाराम काग, घीसाराम एवं मोहनलाल भायल यांच्यासह अनेक समाजबंधू उपस्थित होते.

[ad_2]

Related posts