India Alliances Meeting Adjournment Next Meeting Set For August 31 And September 1 St In Mumbai

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

INDIA Alliance’s Next Meeting : इंडिया आघाडी (INDIA Alliance) ची मुंबईतील (Mumbai) बैठक लांबणीवर गेली आहे. आता इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईतली बैठक लांबणीवर पडली आहे. आधी ही बैठक 25 आणि 26 ऑगस्टला ठरली होती, आता मात्र ही बैठक ऑगस्ट महिन्याच्या शेवटी होणार आहे.

इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक लांबणीवर

इंडिया आघाडीची मुंबईत होणारी बैठक काही दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. काही नेत्यांनी आपण ऑगस्ट महिन्यात उपलब्ध नसल्याचं सांगितलं होतं. या नेत्यांमध्ये शरद पवारांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली होती. कारण 16 ऑगस्ट रोजी थोरले पवार राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे 25 आणि 26 ऑगस्ट रोजी आपण मुंबईत उपलब्ध असू शकणार नाही, असं पवारांनी कळवल्याची माहिती समोर आली आहे.

31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक

26 पक्षांच्या विरोधी आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची पुढील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. इंडिया आघाडीने यापूर्वी सांगितले होते की, या बैठकीत ते आघाडीची समन्वय समिती, संयुक्त सचिवालय आणि इतर पॅनेलसाठी नावे निश्चित करण्यात येणार आहेत. इंडिया आघाडीची मुंबईतील बैठकीचे आयोजन शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे करणार आहेत. याबैठकीत प्रचार, प्रसारमाध्यमे आणि आंदोलनासाठी इंडिया आघाडीकडून समित्या स्थापन करण्यात येतील. 

मागील बैठकीत इंडिया आघाडीने विविध सहभागींच्या राजकीय पक्षांचा अजेंडा सामावून घेणारा संयुक्त ठराव स्वीकारला होता. भारताच्या फेडरल रचनेवरील कथित हल्ले, आर्थिक आघाडीवर मोदी सरकारचे कथित अपयश आणि गव्हर्नेटरीय कार्यालये आणि केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर याविषयी इंडिया आघाडीकडून चिंता व्यक्त करण्यात आली 

11 सदस्यीय समन्वय समिती

18 जुलै रोजी बेंगळुरूच्या बैठकीनंतर, काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं होतं की, “मुंबईत 11 सदस्यीय समन्वय समिती स्थापन केली जाईल. प्रचार व्यवस्थापन आणि संयुक्त रॅली आणि कामकाजासाठी केंद्रीय सचिवालय देखील स्थापन केले जाईल. 11 सदस्यीय समन्वय समिती सर्व पक्षांचे प्रतिनिधी असतील. यांच्याद्वारे संवादाचे मुद्दे, संयुक्त रॅली, जागावाटप आणि विरोधी आघाडीच्या अशा इतर बाबींसह निवडणूक आणि राजकीय रणनीतीची भविष्यातील वाटचाल ठरवली जाईल. मुंबईच्या बैठकीत आघाडी अध्यक्षाची निवड करण्यात येईल, असंही खरगे यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts