Wrestler Bajranag Punia Challange To BrijBhushan Singh; बृजभूषण सिंग यांच्या आव्हानाला बजरंग पुनियाचे प्रत्युत्तर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग हे महिला खेळाडूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. गेल्या एक महिन्यापासून खेळाडू दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. मात्र, सरकारने अजूनही महिला खेळाडूंच्या या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. कोर्टाने आदेश दिल्यावर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून घेतला आहे. मात्र, बृजभूषण यांनी आपल्यावरील आरोप नाकारले असून आरोप करणाऱ्या महिला खेळाडूंना नार्को टेस्ट करण्याचे आव्हान दिले होते.आता, या आव्हानाला महिला खेळाडूंच्या समर्थनात आंदोलन करणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने बृजभूषण सिंग यांचं चॅलेंज स्वीकारलं आहे. बजरंग म्हणाला की, आतापर्यंत या संघटनेत किती घोटाळे झाले आहेत याची मोजणी करायची असेल तर आम्ही नार्को चाचणीला तयार आहोत. तसेच आमच्याबरोबरच विनोद तोमर, महिला कुस्तीपटूंचे प्रमुख प्रशिक्षक जितेंद्र, फिजिओ धीरेंद्र प्रताप यांची देखील नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

घरी अठरा विश्व दारिद्र्य, नवऱ्याचा चहाचा गाडा, तिथेच बसून अभ्यास केला, अंगावर खाकी चढवलीच…!
कुस्तीपटूंच्या पत्रकार परिषदेत साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी पुन्हा एकदा बृजभूषण शरणसिंग यांच्यावर आरोप केले. यावेळी बोलताना बजरंग म्हणाला की, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून ही नार्को टेस्ट करण्यात यावी. तसेच ही नार्को टेस्ट संपूर्ण देशात लाईव्ह दाखवली जावी. तक्रार करणाऱ्या सातही महिला खेळाडूंची नार्को टेस्ट करा, असं सांगताना त्यांनी बृजभूषण यांचं चॅलेंज स्वीकारलं.

ज्या व्यक्तीवर सात मुलींनी अत्याचाराचे आरोप केले आहेत, त्या व्यक्तीला हिरो बनवू नये. तसेच ते गुन्हेगार असून त्यांना एखाद्या स्टारप्रमाणे वागणूक देऊ नये असे विनंतीही विनेश फोगट हिने केली.

मोक्याच्या क्षणी RCB बाहेर, संघाची खिल्ली उडवणाऱ्या टीकाकारांना विराटचं सडेतोड उत्तर
आतापर्यंत खेळाडूंच्या आंदोलनाला किसान संघटना आणि खाप पंचायतीने पाठिंबा दिला असून या खेळाडूंनी बृजभूषण यांना अटक करण्याची मागणी केली आहे. २३ मे रोजी या खेळाडूंच्या आंदोलनाला एक महिना पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने २३ मे रोजी इंडिया गेट पर्यंत कॅंडल मोर्चा काढण्यात येणार आहे.

[ad_2]

Related posts