Horoscope 8 August 2023 : ‘या’ राशींनी सतर्क राहण्याची गरज, अन्यथा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 8 August 2023 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही राशींसाठी खूप चांगला जाणार आहे. तर दुसरीकडे, काही राशीच्या लोकांच्या आरोग्यात चढ-उतार दिसतील. आजचे राशीभविष्य वाचा आणि जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल.

मेष (Aries)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागणार आहे.  व्यवसायात नफा होईल, आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. आरोग्य ठीकठाक असेल. 

वृषभ (Taurus) 

तुम्ही नवीन कामाल सुरुवात करु शकता. व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरणार आहे. मान-सन्मानात वाढेल. कुटुंबातील एखाद्याच्या सदस्याच्या आरोग्यामुळे चिंतेत असाल. 

मिथुन (Gemini)

तुम्ही एखाद्या संकटात अडकण्याची शक्यता आहे.  निरर्थक वादावादी करु नका. बोलण्यावर संयम राखा. व्यवसायात कोणतेही नवीन काम हाती घेऊ नका. आर्थिक जोखीम धोक्याची ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. 

कर्क (Cancer)

आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. निरर्थक वादविवादांपासून दूर राहणं योग्य होईल. वडिलोपार्जित संपत्तीवरून कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम लक्ष देऊन करा. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवल्याने तुमचं नुकसान होण्याची भीती आहे. वाहन जपून चालवा. 

सिंह (Leo)

तुमचे जुने रखडलेले काम मार्गी लागल्यामुळे मनावरील ताण कमी होईल.  कामाच्या ठिकाणी प्रियजनांचे सहकार्य मिळाल्यामुळे ऑफिसमधील वातावरण आनंदी असेल. प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना बढती मिळणार आ पत्नीचे सहकार्य लाभल्यामुळे आनंदी असाल. जुन्या मित्राची भेटणार आहे.

कन्या (Virgo)

तुमचं आरोग्य उत्तम असणरा आहे. आर्थिक स्थिती चांगली होईल. व्यापार-व्यवसायात नवीन काम हाती घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यातून नफा होणार आहे.  कुटुंबात शुभ कार्य ठरणार आहे. 

तूळ (Libra)

आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जेवण्यावर नियंत्रण ठेवा. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका. व्यवसायात जुन्या सहकारी जोडीदारामुळे तुम्हाला नुकसान सहन कराव लागण्याची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहणं चांगलं होईल. 

वृश्चिक (Scorpio)

आज तब्येत नरमगरम असेल.  जास्त कामामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवणार आहे. काही कामासाठी लांबचा प्रवास जावं लागणार आहे. आज तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीमुळे वादात अडकू शकता. कुटुंबासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. 

धनु (Sagittarius)

धार्मिक प्रवासाला जाण्याचे योग आहेत. आज तुमचे मन प्रसन्न असेल.  कुटुंबात शुभ कार्य घडणार आहे. अध्यात्माकडे तुमची रुची वाढणार आहे.  तुमच्या तब्येतीत काही चढ-उतार राहतील. व्यवसायात नवीन काम सुरु करु शकता. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचे योग आहेत. 

मकर (Capricorn)

तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचं ठरवू शकता. आज तुम्हाला तब्येतीत बरं वाटले. कुटुंबात आपुलकी आणि प्रेमाचे वातावरण असल्याने मनं प्रसन्न राहील.  आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत नवीन कामाबद्दल प्रस्ताव ठेवणार आहात. तुम्हाला व्यवसायात नवीन नोकरीची संधी मिळणार आहे.

कुंभ (Aquarius) 

तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत चिंता वाटणार आहे. त्यामुळे तुमचं मन अशांत असणार आहे. कुटुंबातील कोणापासून दुरावले जाणार आहात. आज वादविवादात न पडल्यास तुमच्यासाठी बरं होईल. अन्यथा अपमानाचा सामना करावा लागले. व्यवसायात चढ-उतार पाहिला मिळेल. 

मीन (Pisces)

आज तुम्ही थोडे सावध राहणं गरजेचं आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. वादविवादापासून दूर राहा. कुटुंबात किंवा समाजातील एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts