Doctors To Be Penalised For Not Prescribing Generic Drugs Says New NMC Regulation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) ने डॉक्टरांसाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. यानुसार रुग्णांना जेनेरिक औषधे (Generic Medicine) प्रिस्क्राइब न केल्यास डॉक्टरांवर कारवाई होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषध देण्यावर अधिक भर द्यावा, यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नवीन नियम लागू केले आहेत. सध्या डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देणं आवश्यक असलं तरी, याबाबत काही नियमही नव्हता. ही बाब लक्षात घेत NMC ने जेनेरिक औषधे प्रिस्क्राइब करण्यासाठी नवा नियम लागू केला आहे. 

जेनेरिक औषधे लिहून देणे बंधनकारक

डॉक्टरांना आता जेनेरिक औषधे लिहून देणे बंधनकारक असले तरी 2002 मध्ये NMC ने जारी केलेल्या नियमांमध्ये कोणतीही दंडात्मक तरतूद नमूद केलेली नाही. मात्र, आता संबंधात नवीन नियमावली जारी करण्यात आली असून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल. तसेच त्या डॉक्टरांचं लायसन्स रद्द होऊ शकतं.

ब्रँडेड जेनेरिक औषधं लिहीण टाळावं

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नवीन नियमानुसार, आता डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन लिहून देताना जेनेरिक औषधं लिहून द्यावी लागतील. तसेच कोणतीही ब्रँडेड जेनेरिक औषधं लिहीण टाळावं लागणार आहे. याचाच सोपा अर्थ म्हणजे डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहिताना संबंधित आजारावर रुग्णांना कोणता औषधाचा फॉम्युर्ला आवश्यक आहे, फक्त याचा उल्लेख करावा. कोणत्याही जेनरिक औषधांच्या ब्रँडचा उल्लेख करुन नये. डॉक्टरांना आता हे निय पाळावे लागणार आहेत, असे न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यामुळे काही काळासाठी संबंधित डॉक्टरांचा परवानाही रद्द होऊ शकतो.

जेनेरिक औषधे म्हणजे काय?

जेनेरिक औषधे ही इतर ब्रँडेड औषधांप्रमाणेच असतात. मात्र, या औषधांना कोणत्याही ब्रँडचे नाव नसते, त्यामुळे ही औषधे जेनेरिक नावाने ओळखली जातात. जेनेरिक औषधे इतर ब्रँडेड औषधांप्रमाणेच फॉर्म्युला वापरून तयार केली जातात. यामध्ये एकसारखेच संयुगे वापरून तयार केली जातात. पण, ब्रँडेड औषधांच्या तुलनेनं जेनेरिक औषधे स्वस्त असतात. यामध्ये फरक फक्त एवढाच की एखादा ब्रँड ही औषधे तयार करतो, तेव्हा तो त्यामध्ये पॅकेजिंग, ब्रँडिग आणि मार्केटिंग यासाठी खर्च करतो. त्याउलट छोट्या कंपन्या ही औषधे तयार करुन थेट बाजारात विकतात. त्यामुळे ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांच्या किमतीत मोठा फरक असतो.

डॉक्टरांशी गैरवर्तन पडणार महागात

आता रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांसोबत (Doctor) गैरवर्तवणूक केल्यास डॉक्टर संबंधित रुग्णावर उपचार करण्याचे नाकारू शकणार आहेत, नॅशनल मेडिकल कौन्सिलने त्यासंदर्भात निर्णय घेत डॉक्टरांना उपचार करणे नाकारण्याचा अधिकार दिला आहे. 

[ad_2]

Related posts