Abp News C Voter Survey Did Rahul Gandhi Insult Parliament By Flying Kiss Whats Is Reaction Of Public On This

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या फ्लाईंग किसवरून सध्या चांगलाच वाद रंगला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी (Smriti Irani) यांचा आरोप आहे. या विषयावर एबीपीच्या सी-वोटरने सर्वेक्षण करत जनतेचं मत काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एबीपीच्या सी-व्होटरने एका सर्वेक्षणात, जनतेला प्रश्न विचारला की, राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस देत संसदेचा अपमान केला का? यावर जनतेचं मत काय? जाणून घ्या.

या सर्वेक्षणात 56 टक्के लोकांनी ‘हो’ उत्तर देत राहुल गांधी यांचं हे वर्तन संसदेचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. तर 33 टक्के जनतेनं ‘नाही’ उत्तर देत हा संसदेचा अपमान नसल्याचं म्हटलं आहे. तर 11 टक्के लोकांना ‘माहित नाही’ असं उत्तर दिलं आहे.

राहुल गांधी यांनी संसदेच अपमान केला?

  • हो : 56%
  • नाही : 33%
  • माहित नाही : 11%

काय आहे प्रकरण?

खासदारकी बहाल झाल्यानंतर 9 ऑगस्ट रोजी राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत सहभागी झाले. मात्र राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात सापडले. सभागृहातून जात असताना राहुल यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. लोकसभा सचिवालयाची सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेत असभ्य वर्तनाबाबत सर्वांशी बोलून नियमानुसार कारवाई केली जाईल, असं सांगितलं जात आहे.

स्मृती ईराणी यांचा नेमका आरोप काय?

स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांच्या वर्तनावर तीव्र आक्षेप घेतला म्हटलं की, “माझा एका गोष्टीवर आक्षेप आहे. ज्यांना माझ्या आधी बोलण्याची संधी देण्यात आली होती, त्यांनी जाण्यापूर्वी असभ्य वर्तन केलं. संसदेच्या महिला सदस्य असलेल्या संसदेला फ्लाइंग किस देऊ शकणारा हा केवळ दुष्ट पुरुष आहे. असं अशोभनीय वर्तन यापूर्वी कधीही देशाच्या संसदेत पाहिलं नव्हतं.”

राहुल गांधींवर कारवाई होणार?

राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचं पत्र दिलं आहे. राहुल गांधींनी संसदेत केलेल्या गैरवर्तनासंदर्भात भाजपच्या 22 खासदारांनी तक्रारीचं पत्र दिल्याची माहिती आहे.



[ad_2]

Related posts