Invitation To Baramati Farmer Couple For Event To Be Held At Red Fort On 15th August

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Independence Day : मंगळवारी देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) साजरा (Independence Day 2023) करण्यात येणार आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, लाल किल्ल्यावर दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना उद्देशून केलेलं भाषण ऐकण्यासाठी देशभरातील अनेकांना निमंत्रित केलं जातं. यावर्षी महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक संघटना योजनेच्या 24 लाभार्थ्यांना 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणाऱ्या समारंभाला बोलावण्यात आलं आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील खताळपट्टा येथील अशोक सुदाम घुले या दाम्पत्याची निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी अशोक सुदाम घुले या दामपत्याला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरुन केलेले भाषण ऐकण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 1 हजार 800 व्यक्तींमध्ये या योजनेच्या अडीचशे लाभार्थ्यांचा त्यांच्या जोडीदारासह समावेश आहे. केंद्र सरकारच्या ‘लोकसहभागा’च्या संकल्पनेला अनुसरून, केंद्र सरकारने देशभरातून, समाजाच्या विविध घटकांतील लोकांना स्वातंत्र्यदिन सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्याचा हा उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमासाठी दिल्लीत आलेल्या विशेष पाहुण्यांना राष्ट्रीय युद्ध स्मारक तसेच पंतप्रधान संग्रहालय या ठिकाणांना भेट देण्याची संधी यांना मिळणार आहे.

सरपंच, शिक्षक, शेतकरी, मच्छिमारांसह सरकारी कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तिंना निमंत्रण 

पंतप्रधानांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रित त्यांच्या जोडीदारासह आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या  उपस्थितीत हा सोहोळा पार पडेल. या विशेष निमंत्रितांमध्ये व्हायब्रंट व्हिलेजेसचे  सरपंच, शिक्षक, शेतकरी,मच्छिमार तसेच सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल या आणि अशाच इतर महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) योजनेच्या 24 लाभार्थ्यांना नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून केलेले भाषण ऐकण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 1800 व्यक्तींमध्ये या  योजनेच्या अडीचशे लाभार्थ्यांचा त्यांच्या जोडीदारासह समावेश आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणीमधील धाडगाव येथे राहणारे लालसिंग वन्या वळवी हे राजधानी दिल्ली आणि लाल किल्ल्याला प्रथमच भेट देण्यासाठी आणि स्वातंत्र्यदिन सोहोळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. सरकारने त्यांच्या एफपीओचे कार्य ओळखून त्यांना नवी दिल्ली येथे होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यासाठी आमंत्रित केल्यामुळे वळवी अत्यंत आनंदित झाले आहेत. नाबार्डच्या मदतीने स्थापन झालेल्या त्यांच्या ‘आमु आखा एक से’ या एफपीओने  200 ते 300 एकर क्षेत्रावर सेंद्रिय आंबा, कोकम, भरड धान्ये आणि तुरडाळ यांचे पीक घेतले आहे. त्यांच्या गावातील दीडशेहून अधिक कुटुंबे या एफपीओमध्ये कार्यरत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

15 August flag hoisting Pune : पुण्यात अजित पवार, चंद्रकांत पाटील नाही तर ‘हे’ करणार स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

[ad_2]

Related posts