You Can Exchange Two Thousand Rupees From Today But You Can Only Deposite These Notes In Post Office Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

2000 Rupee Notes Exchange: दोन हजारांच्या नोटा (2000 rs) जमा करण्यासाठी आणि बदलण्यासाठी तुम्हाला केवळ बँकेत किंवा आरबीआयच्या (RBI) प्रादेशिक कार्यालयात जावे लागणार आहे. टपाल कार्यालय किंवा पोस्ट ऑफिसला (Post Office) यापासून दूर ठेवण्यात आले आहे. परंतु तुम्ही टपाल कार्यालयात दोन हजारांच्या नोटा जमा करु शकता कारण ती अजूनही चलनात आहे. पण यासाठी तुमचे पोस्टात खाते असणे आवश्यक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हजारांच्या नोटा केवळ बँकेत आणि आरबीआयमध्ये बदलता येणार आहे. तसेच बँकांमध्ये दोन हजरांच्या नोटा जमा करता येणार आहे. 

23 मे रोजी दोन हजारांच्या जमा करण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. ज्यांच्याकडे 2000 रुपयांची नोट आहे ते कोणच्याही बँकेच्या शाखेत जाऊन ती बदलून घेऊ शकतात. आरबीआयने केलेल्या घोषणेनंतर नागरिक दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करु शकतात किंवा दोन हजारांच्या नोटा बँकेत जाऊन बदली करु शकतात. आरबीआयनं आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे की, जोपर्यंत या नोटा चलनात आहेत तोपर्यंत नागरिक दोन हजारांच्या नोटांचा वापर करुन व्यवहार करु शकतात. 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर काढली जात आहे. नोट पूर्णपणे वैध आहे. तुम्हाला हव्या त्या ठिकाणी खरेदी, व्यवहार यासाठी तुम्ही या नोटा वापरू शकता. तसेच, दोन हजारांची नोट घेणं कोणीही नाकारू शकत नाही.

बँकांमध्ये दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कोणतेही निर्बंध लावले नाही आहेत. तसेच यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म देखील तुम्हाला भरायचा नाही आहे. आरबीआयच्या शाखेमध्ये तुम्ही एका वेळी दोन हजारांच्या दहा नोटाच बदलू शकता म्हणजेच एका वेळी वीस हजार रुपये तुम्ही बँकेत जमा करु शकता किंवा बदली करु शकता. तर बँकेमध्ये नोटा बदली करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही आहे. आरबीआयने सामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटांची बदली करण्याचे तसेच त्या बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. 

पोस्ट ऑफिसमध्ये नोटा फक्त जमा होणार

टपाल कार्यालयात मात्र तुम्ही दोन हजारांच्या नोटा फक्त जमा करु शकता. परंतु यासाठी खातेधारकांची केवायसी असणे आवश्यक आहे. परंतु तुम्ही टपाल कार्यालयात दोन हजारांच्या नोटांची बदली करु शकत नाही. 

news reels Reels

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आजपासून ‘नोटबदली’ सुरू… जाणून घ्या दोन हजारांची नोटांसंदर्भातील तुम्हाला पडलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

 

[ad_2]

Related posts