[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Tomato Price: स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याचा (Tomato Price Drop) निर्णय घेतला आहे. भाज्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे, विशेषतः महागलेल्या टोमॅटोंच्या किमतींमुळे (Tomato Price) जुलै 2023 मध्ये अन्नधान्य महागाईचा दर 11.51 टक्क्यांवर पोहोचला आहे. यानंतर 15 ऑगस्ट 2023 पासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर सरकारने टोमॅटो (Tomato) 50 रुपये किलोने विकण्याची घोषणा केली आहे.
घाऊक बाजारात दर घटल्याने टोमॅटो स्वस्त
केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेडला (NAFED) टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याच्या सूचना दिल्या आहेत. अलीकडच्या काळात घाऊक बाजारात टोमॅटोच्या किमतीत घट झाली असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितलं आणि त्यामुळे टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इतर राज्यांत टोमॅटोची स्वस्त दरात विक्री सुरू
मंत्रालयाने सांगितलं की, 14 जुलै 2023 पासून दिल्ली-एनसीआरमध्ये स्वस्त दरात टोमॅटोची विक्री सुरू झाली आहे. 13 ऑगस्ट 2023 पर्यंत नाफेड आणि NCCFने किरकोळ बाजारात 15 लाख किलो टोमॅटोची खरेदी आणि विक्री केली आहे. दिल्ली एनसीआर व्यतिरिक्त राजस्थानमधील जोधपूर कोटा, उत्तर प्रदेशातील लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि बिहारमधील पटना, मुझफ्फरपूर, आराह, बक्सरमध्ये टोमॅटो स्वस्त दरात विकले गेले आहेत.
टोमॅटो प्रतिकिलो 50 रुपयांनी विकले जाणार
प्रथम एनसीसीएफ आणि नाफेडने टोमॅटो 90 रुपये प्रतिकिलो दराने विकण्यास सुरुवात केली, त्यानंतर 16 जुलै 2023 पासून दर 80 रुपये प्रति किलोपर्यंत कमी केले. 20 जुलैपासून दर 70 रुपये करण्यात आले आणि आता स्वातंत्र्य दिनापासून टोमॅटो 50 रुपये किलोने विकला जाणार आहे.
दिल्ली आणि नोएडात स्वस्त टोमॅटोची विक्री
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितल्यानुसार, NCCFने दिल्लीतील 70 ठिकाणी आणि नोएडा ग्रेटर नोएडामधील 15 ठिकाणी मोबाईल व्हॅन बसवून सर्वसामान्यांना स्वस्त दरात टोमॅटो विकले आहेत. NCCFने ओएनडीसी (ONDC) मार्फत स्वस्त दरात ऑनलाईन टोमॅटो विकत आहे. ग्राहक व्यवहार विभाग, एनसीसीएफ आणि नाफेडने आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये या टोमॅटोची खरेदी-विक्री केली आहे. या राज्यांत एका महिन्यात टोमॅटोची किंमत खूप वाढली आहे आणि या राज्यात टोमॅटोचा वापर देखील जास्त आहे.
बाजार समित्यांमध्येही टोमॅटोचे दर घसरले
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो (Tomato Rate) भलताच फॉर्मात होता, यामुळे कधी नव्हे ते शेतकऱ्यांना चार पैसे मिळत होते. मात्र अशातच केंद्र सरकारच्या निर्णयानंतर टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. नाशिकच्या (Nashik Bajar Samiti) सर्वच बाजार समित्यांमध्ये जवळपास पन्नास टक्के दाराची घसरण झाल्याचं निदर्शनास आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nashik Tomato : टोमॅटोची लाली उतरली, नाशिकमध्ये 20 किलोच्या कॅरेट्सला 1200 रुपयांचा दर, तर शंभरचे एक किलो
[ad_2]