Tweet Deck Now Requires Subscription To Access Name Changed In X Pro Know In Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : ट्विटर कायमच त्यांच्या सर्विसेसमध्ये अपडेट करत असते. कंपनी यूजर्सकरता नेहमी नवीन सर्विस देण्याच्या प्रयत्नात असते. अशात नुकतेच ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला होता तो म्हणजे त्यांनी लोगो बदलला होता. इलॉन मस्क यांनी ट्विटर बर्ड लोगो बदलून ब्लू बर्डच्या जागी “X” असा लोगो केला.

मात्र आता पुन्हा एकदा कंपनीने मोठा बदल केला आहे. तर हा बदल करण्यात आला आहे TweetDeck मध्ये. तुम्ही जर TweetDeck वापरत असाल तर आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. Twitter ने TweetDeck चे नाव बदलून X Pro केले आहे. तुम्हाला हे फिचर वापरण्याकरता दर वर्षाला 6,800 रुपये द्यावे लागणार आहेत. 

काय आहे TweetDeck?

हे एक अॅप्लिकेशन आहे ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी अनेक खाती ऑपरेट करु शकता. तसेच इतर लोकांच्या अकाऊंटवर लक्ष ठेवू शकता. आतापर्यंत ही सेवा मोफत देण्यात येत होती. मात्र या फीचरसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. जर तुम्ही X Pro सेवेचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला वार्षिक 12 टक्के सूट मिळू शकते. 

‘या’ सेवा होणार उपलब्ध!

लवकरच तुम्हाला X मध्ये व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलची सुविधा मिळेल. यामुळे अॅपवरील चॅटिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला होईल. एलॉन मस्क यांनाला ट्विटर (आता X) चीनच्या WeChat सारखे बनवायचे आहे. 

X मधून पैसे कमवू शकता

आता तुम्ही youtube सारखे X Pro वरुन पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीच्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील. तुमच्या खात्यावर 500 फॉलोअर्स असायला हवे.

ट्विटरने ही कंपनी 2011 मध्ये विकत घेतली 

लंडनस्थित TweetDeck कंपनी ट्विटरने 2011 साली विकत घेतली होती. यासाठी ट्विटरला 40 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 332 कोटी रुपये मोजावे लागले होते. ट्विटरच्या TweetDeck सेवेद्वारे, वापरकर्ते त्यांच्या आवडीच्या वेगवेगळ्या ट्विटर हँडलचे ट्वीट एकाच वेळी पाहू शकतात. 

 

तर काही दिवसांपू्र्वी ट्विटरचे लोकप्रिय ट्वीट (Tweet) बटण आता पोस्ट (Post) केले गेले. त्याच वेळी, यूजर्स आता रिट्वीटच्या (Retweet) जागी (Repost) हा पर्याय वापरु शकणार होते. एक्स न्यूज डेलीनुसार, नवा बदल नुकताच Android साठी बीटा व्हर्जनमध्ये करण्यात आला आहे. एलॉन मस्क यांनी नुकताच हा बदल ट्विटरवर केला होता. त्यामुळे या बदलानुसार आता ट्विटरचा वापर करणाऱ्या यूजर्सना Retweet च्या जागी Repost हे बटण दिसते. सध्या हा नवीन बदल Android साठी बीटा व्हर्जनमध्ये करण्यात आला आहे.  

 

इतर महत्वाच्या बातम्या

 

 

[ad_2]

Related posts