[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Vistara Airline Controversy: दिल्लीहून (Delhi) फ्रँकफर्टला जाणाऱ्या विस्तारा (Vistara) एअरलाईन्सच्या विमानामध्ये एका 10 वर्षांच्या मुलीच्या पायावर हॉट चॉकलेट (Hot Chocolate) पडल्याने तिचा पाय प्रचंड भाजला. या घटनेसंबंधात एअरलाईन्सकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तर तिच्या कुटुंबियांनी कंपनीवर संताप व्यक्त केला आहे. यावेळी माध्यमांना प्रतिक्रया देताना तिच्या कुटुंबियांनी म्हटलं की, ‘केबिन क्रूच्या निष्काळजीपणामुळे, मुलीच्या पायावर हॉट चॉकलेट सांडले, ज्यामुळे तिच्या पायाला दुखापत झाली आहे’ यावर एअरलाइन्सकडून देखील दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘आमच्याकडून हे चुकून झालं आहे. त्यामुळे आम्ही उपचाराची जबाबदारी घेतली आहे.’
ही पूर्ण घटना दिल्लीवरुन फ्रँकफर्टला जाणाऱ्या विमानामध्ये घडली आहे. तसेच या घटनेनंतर कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला. एअरलाईन्सने देखील त्या कुटुंबियांची माफी मागत तिच्या उपचारासाठी खर्च दिला. तर एअरलाईन्सही त्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबियांना पुन्हा भारतात सुखरुप आणण्यात आलं आहे.
कुटुंबियांनी काय दिली प्रतिक्रिया?
या घटनेमुळे त्या कुटुंबियांची कनेक्टड फ्लाईट देखील सुटली. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, या घटनेनंतर प्राथमिक आम्हाला मदत उपलब्ध करुन देण्यात आली. पण रुग्णवाहिकेत बसवल्यानंतर आम्हाला त्यांनी कोणत्याही मदतीशिवाय सोडण्यात आले. तसेच दुसऱ्या देशात उपचार सुरु असल्याने त्यांना रुग्णालयाची सर्व कामे देखील त्यांनाच करावी लागली असल्याचा दावा देखील मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. तसेच त्यांचे सामान देखील विमानतळावर सोडण्यात आले, जे त्यांच्या मित्राच्या मित्राने जाऊन घेतले.
एअरलाईन्सचं म्हणणं काय?
दरम्यान या घटनेबाबत एअरलाईन्सकडून सविस्तर निवेदन गुरुवार (17 ऑगस्ट) रोजी जारी करण्यात आले आहे. स्पष्टीकरण देताना एअरलाईन्सने म्हटलं की, ’11 ऑगस्ट 2023 रोजी दिल्लीहून फ्रँकफर्टला जाणाऱ्या UK-25 या विमानामध्ये ही दुर्दैवी घटना घडली. हॉट चॉकलेट मुलीच्या अंगावर पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली आहे. मुलीच्या पालकांनी सांगितल्यानंतर आमच्या केबिन क्रूने मुलीला हॉट चॉकलेट दिले होते. तसेच मुलीचा चंचलपणा त्यावेळी सुरु होता म्हणून हा प्रकार घडला.’
सध्या विमानात अनेक विचित्र घटना घडत आहेत. तसेच यामुळे प्रवाशांच्या मनात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे प्रवाशांनी विमानातून निश्चिंत प्रवास करायचा की नाही असा संतप्त सवाल देखील प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा :
चंद्राच्या कक्षेत पोहचलं रशियाचं लूना-25, भारताच्या दोन दिवस अगोदर उतरणार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर
[ad_2]