[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Beed News : बीड जिल्हा हा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा नाही तर शरद पवार (Sharad Pawar) यांचा जिल्हा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी केलं. बीड जिल्हा हा धनंजय मुंडे यांचा जिल्हा असल्यामुळं शरद पवार यांची इथे सभा होत आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी क्षीरसागर यांनी केला. यावर बोलताना बीड जिल्हा हा शरद पवारांचा जिल्हा असल्याचे क्षीरसागर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांची पहिली स्वाभिमान सभा ही आज बीडमध्ये होणार आहे. या सभेची जबाबदारी बीडचे आमदार आणि नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेल्या संदीप क्षीरसागर यांच्यावर आहे. या स्वाभिमान सभेच्या तयारीसाठी आठवडाभर झालं संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्हाभर फिरुन या सभेची पूर्वतयारी केली आहे. पहिली स्वाभिमान सभा बीडमध्ये कशामुळं केवळ धनंजय मुंडे यांचा जिल्हा आहे म्हणून का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी संदीप क्षीरसागर यांना केला होता. त्यावेळी बीड जिल्हा हा शरद पवारांचा जिल्हा असल्याचे सांगितले. जनता पवारसाहेबांसोबत खंबीरपणे उभा असल्याचे क्षीरसागर म्हणाले.
शरद पवारांच्या सभेला लोकांची ढगफुटी होईल
दरम्यान, यापूर्वी ज्या ज्या वेळी शरद पवार साहेबांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या त्या प्रत्येक भूमिकांसोबत हा बीड जिल्हा साहेबांसोबत खंबीरपणे उभा राहिल्याचे संदीप क्षीरसागर म्हणाले. आज जी सभा होणार आहे, या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार असून लोकांची ढगफुटी होईल असं मत संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलंआहे.
परळी विधानसभा मतदारसंघातील नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपसोबत घरोबा केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा ही नाशिकच्या येवलामध्ये घेतली. त्यानंतर दुसरी सभा मराठवाड्यात होत आहे. अजित पवारांना साथ देत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील बहुतेक नेते अजित पवारांसोबत ठेवण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. म्हणूनच, शरद पवारांनी मराठवाड्यातील पहिली स्वाभिमान सभा बीडमध्ये ठेवल्याचे बोलले जात आहे. बीडमध्ये होणाऱ्या स्वाभिमान सभेमध्ये परळीतील बबन गीते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पहिल्याच जाहीर सभेत परळी विधानसभा मतदारसंघातील नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन पवार यांनी धनंजय मुंडेंसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Sharad Pawar: शरद पवारांची आज बीडमध्ये पहिली ‘स्वाभिमान सभा’; गुप्तभेटीवर भाष्य करण्याची शक्यता
[ad_2]