Manish Sisodia News: मनीष सिसोदियांना कोर्टात हजर करताना काय घडलं? केजरीवालांना का आला राग?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: दिल्लीचे माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया हे फेब्रुवारी महिन्यापासून तुरुंगात आहेत. राज्यातील दारू घोटाळा प्रकरणी ते सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. अशातच, दिल्ली पोलिसांनी सिसोदियांच्या मानगुटीला पकडून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंगळवारी सिसोदियांना राउज एव्हेन्यू कोर्टात हजर करत असतानाहा प्रकार घडला.सिसोदियांना दिल्ली पोलिसांनी ज्या प्रकारची वागणूक दिली त्यावरून आता आम आदमी पक्षाने प्रश्न उपस्थित केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आतिथी यांचा व्हिडीओ रिट्विट करत मनीष सिसोदिया यांच्याबरोबर असा दुर्दैवी प्रकार करणं योग्य आहे का? तसेच सिसोदियांबरोबर असे वागण्यासाठी वरून कोणाचा आदेश आहे का? असा सवाल विचारला आहे. याआधी दिल्लीतील मंत्री आतीशी यांनी सदर व्हिडीओ शेअर करत पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली.

Crime News: पोलीस हवालदाराने ब्यूटी पार्लरमध्ये घुसून वधूवर गोळी झाडली, कारण वाचून व्हाल हैराण
सिसोदियांना काही पत्रकारांनी केंद्र आणि राज्यसरकारच्या वादाचा मुद्दा बनलेल्या अध्यादेशावरून प्रश्न विचारला असता,दिल्ली पोलिसांनी त्यांना अशाप्रकारे तात्काळ आत मध्ये नेलं. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सीबीआयवर आरोप केले होते. त्यावेळी या नेत्यांनी मनीष सिसोदियांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास देत आहे. तसेच खोट्या कबुलीजबाबावर स्वाक्षरी करावी म्हणून दबाव आणला जात आहे असे गंभीर आरोप सीबीआयवर केले होते.

हृदयद्रावक! पणतू मालमत्तेत हिस्सा तर मागणार नाही ना?, पणजोबाला होती भिती, मध्यरात्री केले क्रूर कृत्य
या सगळ्या प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी ट्विट करत आपली बाजू मांडली आहे. राउज एव्हेन्यू कोर्टात हजार करत असताना सिसोदियांसोबत दिल्ली पोलिसांनी दुर्दैवी व्यवहार केला असा अपप्रचार केला जात आहे. मात्र, पोलिसांनी केलेली कृती ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक होती. तसेच न्यायालयीन कोठडीत असताना माध्यमांना निवेदन देणे हे कायद्याच्या विरोधात आहे.

मुंबईत रेड लाइट एरिया कुठे आहे?; रिक्षाचालकाला विचारताच यूपीतील जोडपे गजाआड, वाचले १८ वर्षीय मुलीचे आयु्ष्य
दिल्लीतील दारू घोटाळ्यात आरोपी करण्यात आलेले मनीष सिसोदिया सध्या तिहार तुरुंगात असून सिसोदियांसमोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. सिसोदियांचा जामीन अर्जदेखील फेटाळला गेला आहे.

[ad_2]

Related posts