Police Constable Shoots Wife 4 Years Old Daughter Watch UP; पोलिस कॉन्स्टेबलने पत्नीला बेदम मारलं, मग गोळी झाडली, अन्… चार वर्षांची लेक सारं बघत होती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बुलंदशहर: घरगुती वादातून पोलिसाने पत्नीच्या पायात गोळी झाडली. त्यावेळी त्यांची चार वर्षांची मुलगीही तेथे उपस्थित होती. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील नीमखेडा गावातील हे प्रकरण असल्यची माहिती आहे. रविवारी रात्री काही कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. यादरम्यान पती विनोद कुमारने पत्नीला मारहाण केल्यानंतर तिच्या पायात गोळी झाडल्याचा आरोप आहे. आरोपी विनोद कुमार कासगंज फॅंटममध्ये हवालदार म्हणून तैनात आहेत.कॉन्स्टेबलने पत्नीवर परवाना असलेल्या पिस्तुलाने गोळीबार केल्याचा आरोप आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून लोक जमल्याचे पाहून विनोदने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, नंतर त्याला अटक करण्यात आली.

Jalgaon News: वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना! २६ बोटांच्या बाळाचा जन्म, जळगावात चर्चाच चर्चा
पोलिस चकमकित आरोपींच्या गोळी झाडण्याची सवय

पोलिसांनी कॉन्स्टेबलची पत्नी संगीता यांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना उच्च वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले. देहत कोतवाल जयकरण सिंह यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी कॉन्स्टेबलला अटक करून त्याला कारागृहात पाठवले आहे. चकमकीदरम्यान विनोद अधिकाऱ्यांसह मिळून आरोपींच्या पायात गोळ्या घालायचं असं सांगण्यात येत आहे.

कॉन्स्टेबर रजेवर गावी आला होता

बुलंदशहरच्या एएसपी अनुकृती शर्मा यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. ही घटना ३५ वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल विनोद कुमारने घडवून आणली आहे. ते सध्या कासगंजमधील सोरोन पोलीस ठाण्यात तैनात आहेत. विनोद कुमार हे दोन दिवसांच्या रजेवर गावी आले होते. त्यांची पत्नी संगीता देवी (३०) हिच्यासोबत काही गोष्टीवरून त्यांचा वाद झाला. त्यानंतर त्यांनी संगीता यांच्या उजव्या पायात परवाना असलेल्या पिस्तुलाने गोळी झाडली. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.

जिथे कधी भांडी घासली, आज त्याच रेस्टॉरंटची मालकीण झाली; १८ वर्षीय तरुणीची थक्क करणारी कहाणी
दुसऱ्या दिवशी कॉन्स्टेबलला अटक

आरोपी पोलिस विनोद कुमारला सोमवारी अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळची शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

नटून थटून नवरदेव आला अन् बोहल्यावर चढण्याअगोदरच जेलमध्ये गेला, प्रेयसीमुळे पोलखोल

४ वर्षांच्या पोरीसमोरच घडला सारा प्रकार

रात्री ३ वाजताच्या सुमारास माझा नवरा मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि त्याने माझ्याशी भांडण सुरू केले. मी विरोध केल्यावर त्याने माझ्या पायात गोळी झाडली. त्यावेळी माझी चार वर्षांची मुलगीही तिथे हजर होती, असं संगिता यांनी पोलिसांना सांगितलं.

[ad_2]

Related posts