Pune Crime News The Police Cracked The Case In Just 48 Hours 17 People Were Arrested In Connection With Nitin Mhaske Murder

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुणे शहरातील मंगला थिएटरबाहेर (Mangala Theatre) नितीन (Pune Crime News) मोहन म्हस्के या तरुणाचा निर्घृण खून (Murder) करण्यात (Pune Crime ) आला होता. हा प्रकार बुधवारी ( 16 ऑगस्ट) पहाटे 1.10 वाजण्याच्या सुमारास मंगला टॉकीज (Pune Crime) समोरील रोडवर घडला होता. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे (Crime branch) शाखेने सहा पथके तयार केली होती. गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत 17 आरोपींना विविध ठिकाणांवरुन ताब्यात घेतलं.

अर्धे आरोपी विशीतील…

सागर ऊर्फ यल्ल्या ईराप्पा कोळानट्टी (वय 35), सुशिल अच्युतराव सुर्यवंशी (वय 27), शशांक ऊर्फ वृषभ संतोष बेंगळे (वय 21), गुडगप्पा फकीरप्पा भागराई (वय 28), एक विधिसंर्घषीत बालक, मलेश ऊर्फ मल्ल्या शिवराज कोळी (वय 24), किशोर संभाजी पात्रे (वय 20), साहिल उर्फ सल्ल्या मनोहर कांबळे (वय 20), गणेश शिवाजी चौधरी (वय 24), रोहित बालाजी बंडगर (वय 20), विवेक ऊर्फ भोला भोलेनाथ नवघरे (वय 25), इम्रान हमीद शेख (वय 31), आकाश ऊर्फ चड्डी सुनिल गायकवाड (वय 22), लॉरेन्स राजु पिल्ले (वय 36), मनोज उर्फ बाबा विकास हावळे (वय 23), रोहन उर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय 23) आणि विकी उर्फ नेप्या काशीनाथ कांबळे (वय 22) अशी अटक कऱण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

48 तासांमध्ये 17 आरोपींना अटक

पुण्यात झालेल्या नितीन म्हस्के या तरुणाच्या हत्येप्रकरणी 48 तासांमध्ये 17 आरोपींना अटक केली आहे. पूर्ववैमन्यास्यातून आणि वर्चस्व वादातून म्हस्के याची पुण्यातील मंगला टॉकीजच्या बाहेर बुधवारी रात्री बारा ते चौदा जणांनी मिळून तलवार, लोखंडी गज असे धारधार हत्याराने हत्या केली होती. हत्येनंतर हे सगळे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी फरार झाले होते. त्यांना आता अटक करण्यात आली आहे, असं  गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितलं आहे. 

विविध शहरातून केलं जेरबंद

लातुर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, पुणे शहर परिसरात तसेच कर्नाटक राज्यातील रायचूर, बेळगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नुसार या गावात विविध पथकं पाठवण्यात आली. या सगळ्या ठिकाणाहून 17 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी ही कामगिरी फक्त 48 तासांमध्ये केली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचं सगळीकडून कौतुक होतं आहे. 

ही बातमी वाचा-

Pune Bhatghar Dam News : रिसॉर्टच्या चुकीच्या बांंधकामामुळे बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू; जलसंपदा विभागाकडून भोरचं सीमा रिसॉर्ट थेट पाडण्यात येणार?

 

 

[ad_2]

Related posts