Pune Bhatghar Dam News Bhor Seema Farm Resort Will Be Demolished By The Water Resources Department

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणात बुडून (Bhatghar Dam)  शिरिश धर्माधिकारी आणि त्यांची 13 वर्षांची मुलगी ऐश्वर्या धर्माधिकारी यांचा मृत्यू झाला. धर्माधिकारी कुटुंब भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बांधण्यात आलेल्या सीमा फार्म रिसॉर्टमधे पिकनीकसाठी गेलं होतं. या रिसॉर्टमध्ये एक कृत्रिम धबधबा तयार करण्यात आला होता आणि त्याचे पाणी पुढे भाटघर धरणात सोडण्यात आले होते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असे बांधकाम करणे अनधिकृत असताना हे बांधकाम करण्यात आलं होतं आणि जलसंपदा विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. आता जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोमवारी या सीमा रिसॉर्टची पाहणी करणार असून त्यानंतर या रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार आहे.

रिसॉर्टमध्ये बांधलेला कृत्रिम धबधबा कुठे संपतो? आणि धरणाच खोल पाणी कुठे सुरु होतो? याचा अंदाज धबधब्यात खेळणाऱ्यांना येत नव्हता. यामुळे शिरिश धर्माधिकारी आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या धबधब्याच्या पुढे असलेल्या खोल पाण्यात गेले आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला. 

सीमा रिसॉर्ट धोक्याचं?

भोर जवळील सीमा रिसॉर्ट हे भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बांधण्यात आल्याचं दिसून येत आहे. याच सीमा रिसॉर्ट रिसॉर्टमध्ये कृत्रिम धबधबा बांधण्यात आला आहे. या रिसॉर्टवर अनेक पर्यटक वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी येतात. मात्र हाच धबधबा मृत्यूला आमंत्रण देण्याची शक्यता आहे. कारण या धबधब्याचा शेवट थेट भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असल्याने धबधब्याचा शेवट नेमका कुठे होतो? आणि धरणाचं क्षेत्र नेमकं कुठून सुरु होतं, याचा अंदाज येणं कठीण आहे. त्यामुळे हा धबधबा पर्यटकांसाठी धोकादायक ठरु शकतो. 

पोलिसांनी कारवाई का केली नाही?

या दोघांच्या मृत्यूला दोन दिवस उलटून गेले. त्यांच्या दोघांच्या एकाच वेळी अशा प्रकारे जाण्याने धर्माधिकारी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. दोन दिवसांनंतरही पोलिसांनी या घटनेची पाहणी करुन कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलीस नक्की रिसॉर्ट मालकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र जलसंपदा विभागाकडून पाहणी करुन हे रिसॉर्ट पाडण्यात येणार असल्याचं किंवा योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune Bhatghar dam news : भाटघर धरणात बापलेकीच्या मृत्यूला कारण ठरलेल्या अनधिकृत रिसॉर्ट मालकाला पोलीस वाचवत आहेत का?

 

 

 

 

[ad_2]

Related posts