19th August In History British East India Company First Cion In Kolkata History Today Marathi 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

19th August In History : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या असलेल्या नाण्यांचा इतिहास फार जुना आहे. इतिहासात आजचा दिवस हा देशातील आधुनिक नाण्याच्या उत्क्रांतीमध्ये पहिलं पाऊल ठरला होता. आजच्याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट 1757 साली ब्रिटिश ईस्ट इंडियाने कोलकाता या ठिकाणी पहिल्या नाण्याची निर्मिती केली. ईस्ट इंडियाचे या नाण्याचा वापर बंगालमधील मुघल प्रांतात केला जायचा. बंगालच्या नवाबासोबत झालेल्या करारानुसार ईस्ट इंडिया कंपनीने 1757 साली ही टांकसाळ बनवली होती. त्यानंतर या नाण्याच्या वापरात वाढ होत गेली. नंतरच्या काळात ब्रिटिशांनी त्यामध्ये वेगवेगळे बदल केले. 

रुपया हे भारताचे चलन असून आजचा विचार करता रुपयाव्यतिरिक्त पाच रुपये, दहा रुपये आणि 20 रुपयांचे नाणे बाजारात आणण्यात आले आहे. त्या आधी 25 पैसे आणि 50 पैशाचे नाणेही वापरात होते. पण कालांतराने ते पाडणं बंद करण्यात आलं. काही विशेष दिनानिमित्ताने 75 रुपये किंवा 100 रुपयांचे नाणे पाडण्यात येते, पण ते बाजारात आणण्यात येत नाही. 

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 19 ऑगस्ट या तारखेला नोंदलेल्या इतर काही महत्त्वाच्या घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे,

1600: अहमदनगरवर अकबराची सत्ता.

1757: ईस्ट इंडिया कंपनीने पहिल्यांता एक रुपयाचे नाणे कलकत्ता येथील टांकसाळीत पाडलं. 

1871 : विल्बर राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राइट यांचा जन्म.

1918: शंकरदयाल शर्मा यांचा जन्म. ते देशाचे नववे राष्ट्रपती बनले. 1992 ते 1997 दरम्यान त्यांनी देशाचे हे सर्वोच्च घटनात्मक पद भूषवले.

1919: अफगाणिस्तानने ब्रिटनपासून स्वातंत्र्य घोषित केले.

1949: भुवनेश्वर ओडिशाची राजधानी बनली.

1960: स्पुतनिक 5 अंतराळयानाने दोन कुत्रे आणि तीन उंदीर अवकाशात पाठवले. चाचणी यशस्वी झाली आणि पाचही जण नंतर जिवंत सापडले.

1964: संप्रेषण उपग्रह Syncom 3 चे प्रक्षेपण.

1966: तुर्की येथे भूकंपामुळे सुमारे 2,400 लोक मरण पावले.

1973: फ्रान्सने अणुचाचणी केली.

1977: सोव्हिएत युनियनने सेरी सागन येथे अणुचाचणी केली.

1978: इराणच्या सिनेमागृहाला लागलेल्या आगीत 422 जणांचा मृत्यू.

1999: भारताच्या आण्विक धोरणाच्या मसुद्यामुळे संतप्त झालेल्या G-8 देशांनी सर्व प्रकारच्या मदतीवर बंदी घालण्याची घोषणा केली.

2004: गुगल या जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट कंपनीने आपले शेअर बाजारात आणले.

2005: श्रीलंका सरकार आणि LTTE यांच्यात शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्याबाबत करार.

2007: स्पेस स्टेशनवर गेलेल्या मिशन एंडेव्हरच्या प्रवाशांनी स्पेसवॉक पूर्ण केला.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts