Chhattisgarh Elections Abp C Voter Survey Opinion Poll Raman Singh Or Bhupesh Baghel Govt Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhattisgarh Elections 2023: लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या दोन्ही राज्यांच्या निवडणुका या लोकसभेसाठी लिटमस टेस्ट आहेत. त्यादरम्यान सी व्होटरने एबीपी माझासाठी सर्वेक्षण केले ज्यामध्ये जनतेला प्रश्न विचारण्यात आला की छत्तीसगडमधील विधानसभेच्या 90 जागांपैकी भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांना किती जागा मिळू शकतात? यावर जनतेने आपले मत मांडले.

एबीपी सी व्होटर सर्वेक्षणानुसार, छत्तीसगडमधील एकूण 90 विधानसभा जागांपैकी भाजपला 35-41 जागा मिळू शकतात. त्याचवेळी काँग्रेसला 48-54 जागा मिळू शकतात आणि इतरांना शून्य ते तीन जागा मिळू शकतात. यावरून छत्तीसगडमध्ये  यावेळीही काँग्रेसचेच सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.

छत्तीसगडमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात,

एकूण जागा – 90

भाजप: 35-41
काँग्रेस: ​​48-54
इतर: 0-3

छत्तीसगडमध्ये भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली 

छत्तीसगडमध्ये भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या 21 उमेदवारांच्या यादीत पाच महिलांना संधी दिली आहे. बस्तर येथून मनीराम कश्यप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रेमनगर येथून भूलन सिंह मरावी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छत्तीगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. अभनापूर येथून इंद्रकुमार साहू, खैरागड येथून विक्रांत सिंह, कांकेर येथून आशारम नेता यांना संधी तिकिट देण्यात आले आहे. 

 

पंतप्रधानपदासाठी कुणाच्या नावाला पसंती? 

या सर्वेक्षणात देशाच्या पुढील पंतप्रधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुम्हाला नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर तुम्ही कोणाला निवडाल?

या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 71 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावाला पसंती दिली आहे. तर 24 टक्के लोकांनी राहुल गांधींचे नाव घेतले आहे. 4 टक्के लोक म्हणतात की या दोघांपैकी कोणीही नाही आणि 1 टक्के लोकांनी ‘माहित नाही’ असे उत्तर दिले आहे. 

काय सांगतोय सर्व्हे? – मोदी आणि राहुल यांच्यात थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर कोणाला निवडाल?

नरेंद्र मोदी-71 %
राहुल गांधी – 24 %
दोन्हीही नाही – 4 %
माहित नाही – 1 %

ही बातमी वाचा :



[ad_2]

Related posts