[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पतीचे निधन झाल्यानंतर महिलेने अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. हे प्रकरण पुण्यातील कोंढवा (Pune kondhwa police station) भागात झालेय. या प्रकरणी महिलेविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. (Pune Latest Crime News update)
कोरोना महामारीमध्ये (coronavirus) पतीचे निधन झाल्यानंतर पुण्यातील कोंढवा भागातील महिलेने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या प्रकरणी एका 28 वर्षीय महिलेविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ क्लिप सापडल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन तरुण आणि आरोपी महिला कोंढवा परिसरात राहतात. दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत. कोरोना काळात या महिलेच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर ही महिला एकटीच होती. दरम्यान जबरदस्ती केल्याची खोटी तक्रार पोलिसात देईल, अशी धमकी या अल्पवयीन तरुणाला महिलेने दिली. धमकी देऊन महिलेने त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. या संपूर्ण कृत्याचा तिने मोबाईलमध्ये व्हिडिओ क्लिप देखील या तरुणाला काढण्यासाठी भाग पाडली. 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. दरम्यान या महिलेच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारची अश्लील क्लिप असल्याचे पीडित तरुणाच्या कुटुंबीयांना समजले होते. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तरुणाच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकारणाचा तपास करत आहेत.
[ad_2]