मिझोराममध्ये निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळला; 17 मजुरांचा मृत्यू, 30 ते 40 मजूर अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mizoram Railway Bridge Collapse: मिझोरामची राजधानी ऐजॉलजवळ निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो, असंही सांगितलं जात आहे. 

मिझोरामच्या रेल्वे ओव्हर ब्रिज प्रकल्पावर हे मजूर काम करत होते. दुर्घटनाग्रस्त पुल क्रमांक 196 ची उंची 104 मीटर आहे. हा पूल दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा उंच आहे. या पुलावरून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर मिझोराम देशाच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडलं जाईल, असा दावा प्रशासनानं केला आहे. पण या पुलाचं काम पूर्ण होऊन तो सुरू होण्यापूर्वीच तो दुर्घटनेला बळी पडला आहे. 

 

[ad_2]

Related posts