Long Distance Relationship मध्ये असलेल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा अजब करार, नात्यात तिसरा आला तर…| Long Distance Relationship girlfriend boyfriend sign relationship contract trending news now

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Trending News : नवरा बायको असो किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो या विश्वास आणि प्रेमाच्या नात्यात तिसरा व्यक्ती आल्यावर त्या नात्याला तडा जातो. जर त्यात नातं हे Long Distance Relationship मध्ये असेल तर नातं तुटण्याचे अनेक कारणं असतात. (Relationship Tips) सोशल मीडियावर अशाच एका Long Distance Relationship मध्ये असलेल्या जोडप्यामधील करार व्हायरल होतो आहे. डेव्हॉन मोटली आणि तिचा प्रियकर गेरेन गॅथ्राइट या दोघांनी या करारावर सह्या केल्या आहेत. (Long Distance Relationship girlfriend boyfriend sign relationship contract trending news now)

रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट करण्यामागे कारण

Long Distance Relationship नातं टिकवण्यासाठी त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. या कॉन्ट्रॅक्टमधील अटी वाचून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात. या कॉन्ट्रॅक्टमधील अटी पाळल्या नाहीत तर ते एकमेकांवर दावा ठोकू शकतात. या कॉन्ट्रॅक्टनुसार हे दोघे सप्टेंबर 2024 पर्यंत नातं तोडू शकतं नाही. 

काय आहे कॉन्ट्रॅक्टमधील अटी?

1. या दोघांना  24/7 एकमेकांच्या संपर्कात राहायचं आहे. एकमेकांच्या कॉलला उत्तर द्यावे लगाले. दररोज संपर्कात रहावं लागले. 

2. या करारात लिहिलं आहे की, दोघांनी एकमेकांच्या घरी गिफ्ट पाठवणे बंधनकारक आहे. 

3. मोबाईलचं लोकेशन नेहमी चालू असायला पाहिजे. प्रत्येक कॉलला उत्तर देणं बंधनकारक आहे. 

4. दररोज एकदा तरी कॉल केला पाहिजे. दिवसभर सतत संपर्कात राहणे आवश्यक आहे. 

5. दुसऱ्या व्यक्तीसोबत झोपणे, संपर्क करणे, लैंगिक क्रिया करणे हे करारानुसार गुन्हा असेल. 

दरम्यान या कॉन्ट्रॅक्टमधील अजब अटी पाहून नेटकऱ्यांनी गर्लफ्रेंडला मानसिक रोगी म्हटलं आहे तर काहींनी तिची बाजू घेतली आहे. 

एका यूजर्सने लिहिलं आहे की, ”हे डॉक्युमेंट अतिशय खराब आहे”. तर एकाने लिहिलं आहे की, ”माझी इच्छा आहे की मीही देखील असा करार करावा”.

तर एकाने लिहिलं आहे की,  ”संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट सोशल मीडियावर शेअर करा म्हणजे आम्हाला त्याचा उपयोग होईल.”

Related posts